हा या वर्षातील ३४६ वा (लीप वर्षातील ३४७ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
१९११ : दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
१९०१ : जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
१७५५ : डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८१ : युवराजसिंग – भारतीय क्रिकेटपटू
१९५० : रजनीकांत – प्रसिद्ध तामिळ अभिनेते
१९४० : शरद पवार – केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
१९१५ : फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (मृत्यू: १४ मे १९९८)
१९०७ : खेमचंद प्रकाश – संगीतकार (मृत्यू: १० ऑगस्ट १९५०)
१९०५ : डॉ. मुल्कराज आनंद – लेखक (मृत्यू: २८ सप्टेंबर २००४)
१८९२ : गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. (मृत्यू: ११ मार्च १९६५)
१८७२ : डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक आणि नाशिक येथील ’भोंसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक (मृत्यू: ३ मार्च १९४८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२ : पण्डित रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्‍न’ (जन्म: ७ एप्रिल १९२०)
२००५ : रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (जन्म: २९ डिसेंबर १९१७)
२००० : जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ - ७ आक्टोबर १९९९) (जन्म: १ आक्टोबर १९३०)
१९९२ : पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (जन्म: १२ जानेवारी १९०६ - आंबेडे, सातेरी, गोवा)
१९९१ : दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर – शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष (१९६३ - १९६६) (जन्म: ? ? ????)
१९६४ : मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (जन्म: ३ ऑगस्ट १८८६)
१९३० : परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून मृत्यू (जन्म: ? ? १९०८)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 19 April, 2014 17:23