हा या वर्षातील १८० वा (लीप वर्षातील १८१ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर
२००१ : पण्डित हृदयनाथ मंगेशकर यांना ’नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर
१९९५ : दक्षिण कोरियातील सेऊल येथे ’सँपूंग डिपार्टमेंटल स्टोअर’ची इमारत कोसळून ५०२ जण ठार तर ९३७ जखमी झाले.
१९७६ : सेशेल्सला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१८७१ : ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला. यापूर्वी कामगार संघटना स्थापन करणार्‍यांना व अशा संघटनांच्या सदस्यांना ब्रिटनमधून तडीपार करुन ऑस्ट्रेलियात पाठवले जात असे.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४५ : चंद्रिका कुमारतुंगा – श्रीलंकेच्या ५ व्या राष्ट्राध्यक्षा
१९३४ : कमलाकर सारंग – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक व लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर १९९८)
१९०८ : प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज (मृत्यू: १९ जुलै १९६८)
१८९३ : प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक (मृत्यू: २८ जून १९७२)
१८९१ : डॉ. प. ल. वैद्य – प्राच्यविद्यासंशोधक (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९७८)
१८७१ : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक (मृत्यू: १ जून १९३४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१० : प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: १५ जुलै १९२७)
२००३ : कॅथरिन हेपबर्न – हॉलिवूड अभिनेत्री (जन्म: १२ मे १९०७)
२००० : कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)
१९९३ : विष्णुपंत जोग – ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक अभिनेते (जन्म: ? ? ????)
१९९२ :

शिवाजीराव भावे – सर्वोदयी कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)

१९८१ : दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)
१९६६ : दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार (जन्म: ३१ जुलै १९०७)
१८९५ : थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा खरा समर्थक (जन्म: ४ मे १८२५)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Tuesday, 14 January, 2014 23:58