हा या वर्षातील २१२ वा (लीप वर्षातील २१३ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : समाजात मूलभूत स्वरुपाची क्रांतिकारक जडणघडण करण्यासाठी झटणार्‍या व्यक्तींना देण्यात येणारा ’राजर्षी शाहूमहाराज समता पुरस्कार’ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर
२००० : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे (CAT) डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार जाहीर
१९९२ : सतारवादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
१९९२ : जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९५६ : कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला. या कसोटी सामन्यात त्याने १९ बळी घेतले.
१९५४ : इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (मांऊंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.
१९३७ : के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला ’वहाँ’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईतील ’मिनर्व्हा’ टॉकीजमधे प्रदर्शित झाला.
१८५६ : न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्टचर्चची स्थापना
१६५८ : औरंगजेब मुघल सम्राट बनला.
१६५७ : मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६५ : जे. के. रोलिंग – हॅरी पॉटर मुळे प्रसिद्ध झालेल्या इंग्लिश लेखिका
१९४७ : मुमताज – अभिनेत्री
१९४१ : अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री (मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)
१९१८ : डॉ. श्रीधर भास्कर तथा ’दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित (मृत्यू: १० एप्रिल २०००)
१९१२ : मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)
१९०७ : दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार (मृत्यू: २९ जून १९६६)
१९०२ : केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक (मृत्यू: २६ डिसेंबर १९८९)
१८८६ : फ्रेड क्‍विम्बी – अमेरिकन अ‍ॅनिमेशनपट निर्माते (मृत्यू: १६ सप्टेंबर १९६५)
१८८० : धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्‍या व ३०० कथा लिहील्या. त्यांचे २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. (मृत्यू: ८ आक्टोबर १९३६)
१८७२ : लक्ष्मण रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक (मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१)
१८०० : फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ सप्टेंबर १८८२)
१७०४ : गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (मृत्यू: ४ जानेवारी १७५२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९८० : मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री (जन्म: २४ डिसेंबर १९२४ - कोटला सुलतान सिंग, पंजाब)
१९६८ : शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. चारही वेदांच्या शुद्ध संहिता, समग्र सार्थ महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी लिहिले. ते हिन्दी, मराठी, गुजराती भाषांत प्रसिद्ध झाले. यांपैकी काही ग्रंथांचे अनुवाद ऊर्दू, कानडी, सिंधी, तेलगू व इंग्रजीमध्येही झाले. (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)
१८७५ : अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २९ डिसेंबर १८०८)
१८६५ : जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)
१७५० : जॉन (पाचवा) – पोर्तुगालचा राजा (जन्म: २२ आक्टोबर १६८९)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 20 February, 2014 15:11