हा या वर्षातील २६८ वा (लीप वर्षातील २६९ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९४१ : ’प्रभात’चा ’संत सखू’ हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.
१९२९ : डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.
१९१९ : रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.
१९१५ : पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६९ : हॅन्सी क्रोनिए – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान (मृत्यू: १ जून २००२)
१९४६ : बिशन सिंग बेदी – फिरकी गोलंदाज
१९२८ : माधव गडकरी – पत्रकार (मृत्यू: १ जून २००६)
१९२६ : बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक (मृत्यू: ३० जून १९९४)
१९२५ : रघुनाथ विनायक हेरवाडकर – बखर वाङमयकार (मृत्यू: ? ? ????)
१९२२ : बॅ. नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (मृत्यू: १७ जानेवारी १९७१ - बेळगाव)
१९२० : सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (मृत्यू: ३ जानेवारी २००२)
१९१६ : पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९६८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०२० : एस. पी. बालसुब्रम्हण्यम – दाक्षिणात्य चित्रपटातील गायक, चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक. पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार विजेते
(जन्म: ४ जून १९४६)
२०१३ : शं. ना. नवरे – लेखक (जन्म: २१ नोव्हेंबर १९२७)
२००४ : अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी (जन्म: १ नोव्हेंबर १९३२)
१९९८ : कमलाकर सारंग – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक व लेखक (जन्म: २९ जून १९३४)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 27 January, 2014 18:39