हा या वर्षातील १५२ वा (लीप वर्षातील १५३ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००४ : रमेश चंद्र लाहोटी यांनी भारताचे ३५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००३ : चीनमधील महाप्रचंड अशा ’थ्री गॉर्जेस’ धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.
२००१ : नेपाळचे राजे वीरेन्द्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेन्द्र यांनी निर्घृण हत्या केली.
१९९६ : भारताचे ११ वे पंतप्रधान म्हणून एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.
१९६१ : अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.
१९५९ : द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.
१९४५ : ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ची स्थापना झाली.
१९३० : मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.
१९२९ : विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर या महाराष्ट्र फिल्म कंपनीतील चार कलावंतांनी कोल्हापूर येथील एक सराफ सीतारामपंत विष्णु कुलकर्णी यांच्या आर्थिक साहाय्याने ’प्रभात फिल्म कंपनी’ची स्थापना केली.
१८३१ : सर जेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर धृवाचे स्थान निश्चित केले.
१७९६ : टेनेसी अमेरिकेचे १६ वे राज्य बनले.
१७९२ : केंटुकी अमेरिकेचे १५ वे राज्य बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७० : आर. माधवन – अभिनेता
१९६५ : नायगेल शॉर्ट – इंग्लिश बुद्धिबळपटू
???? : बाबा आढाव – सामाजिक कार्यकर्ते
???? : लीला गांधी – नर्तिका व अभिनेत्री
१९२९ : फातिमा रशिद ऊर्फ ’नर्गिस’ दत्त – हिन्दी चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: ३ मे १९८१)
१९२६ : नॉर्मा जीन बेकर ऊर्फ मेरिलीन मन्‍रो – अमेरिकन अभिनेत्री (मृत्यू: ५ ऑगस्ट १९६२)
१८७२ : नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ ’कवी बी’ – त्यांची ‘चाफा बोलेना, चाफा चालेना ...‘ ही कविता खूप प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४७)
१८४२ : सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) (मृत्यू: ९ जानेवारी १९२३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००६ : माधव गडकरी – पत्रकार (२५ सप्टेंबर १९२८)
२००२ : दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन (जन्म: २५ सप्टेंबर १९६९)
२००१ : नेपाळचे राजे वीरेन्द्र यांची हत्या (जन्म: २८ डिसेंबर १९४५)
२००० : मधुकर महादेव टिल्लू – एकपात्री कलाकार (जन्म: ? ? १९३३)
१९९८ : गो. नी. दांडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार व ’गडसम्राट’ (जन्म: ८ जुलै १९१६)
१९९६ : नीलम संजीव रेड्डी – भारताचे ६ वे राष्ट्रपती, लोकसभेचे ४ थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते (जन्म: १९ मे १९१३ - इलुरू, तामिळनाडू)
१९८७ : ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास – दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार (जन्म: ७ जून १९१४)
१९८४ : नाना पळशीकर – अभिनेते (जन्म: ? ? १९०७)
१९६८ : हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (जन्म: २७ जून १८८०)
१९४४ : महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट, कलेला वाहून घेतलेल्या या चित्रकाराने सुमारे ५,००० हून अधिक चित्रे काढली. (जन्म: १८ मार्च १८६७)
१९३४ : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक (जन्म: २९ जून १८७१)
१८६८ : जेम्स बुकॅनन – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २३ एप्रिल १७९१)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 17 February, 2014 23:13