हा या वर्षातील १३२ वा (लीप वर्षातील १३३ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२०१० : एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९८ : केन्द्र सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरुन वरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय
१९९८ : भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना ’बिर्ला अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर’ या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
१९५५ : दुसरे महायुद्ध संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
१९५२ : प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
१९०९ : 'सेवानंद' बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली. या संस्थेमुळे महाराष्ट्रातील हजारो गरजू मुलांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले. पुढे संस्थेच्या नावातील अनाथ हा शब्द वगळून संस्थेचे नाव पुणे विद्यार्थी गृह असे करण्यात आले.
१७९७ : पहिले महायुद्ध – नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
१६६६ : आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

???? : नंदू नाटेकर – बॅडमिंटनपटू
१९०७ : विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक, त्यांचे रामराज्य (१९४३), बैजू बावरा (१९५२), गूंज उठी शहनाई (१९५९), हिमालय की गोद में (१९६५) हे चित्रपट खूप गाजले. ’फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. (मृत्यू: १७ आक्टोबर १९९३)
१९०७ : कॅथरिन हेपबर्न – हॉलिवूड अभिनेत्री (मृत्यू: २९ जून २००३)
१९०५ : आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत, ’मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक (मृत्यू: १८ जानेवारी १९८३)
१८९९ : इंद्रा देवी – लाटव्हियाच्या योगशिक्षिका (मृत्यू: २५ एप्रिल २००२)
१८९५ : जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९८६)
१८२० : आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्‍या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म. १९०७ मधे त्यांना ’ऑर्डर ऑफ मेरिट’ हा किताब बहाल करण्यात आला. ’नोटस ऑफ नर्सिंग’ हा त्यांचा ग्रंथ नावाजलेला आहे. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९१०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८८९ : जॉन कॅडबरी – ब्रिटिश उद्योगपती व ’कॅडबरी’ चे संस्थापक (जन्म: १२ ऑगस्ट १८०१)
२०१० : तारा वनारसे (रिचर्डस) – लेखिका (जन्म: ????)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 23 January, 2014 0:22