हा या वर्षातील १९६ वा (लीप वर्षातील १९७ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९७ : पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड
१९९६ : स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
१९६२ : शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्‍या ’ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ
१९५५ : पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर
१९५५ : आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.
१९२७ : समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९२६ : मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरी बस सेवा सुरू झाली.
१६७४ : मुघल सरदार बहादुरशाह कोकलताश याच्या ताब्यात असलेल्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. सुमारे १ कोटिची लूट रायगडावर जमा झाली.
१६६२ : इंग्लंडमधे प्रतिष्ठित असलेल्या ’रॉयल सोसायटी’ची स्थापना

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४९ : माधव कोंडविलकर – दलित साहित्यिक
१९३२ : नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)
१९२७ : प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: २९ जून २०१०)
१९१७ : नूर मोहम्मद तराकी – अफगणिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ सप्टेंबर १९७९)
१९०५ : चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (मृत्यू: २ डिसेंबर १९८०)
१९०४ : गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१)
१९०३ : के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २ आक्टोबर १९७५)
१६११ : मिर्झा राजे जयसिंग (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)
१६०६ : रेंब्राँ – डच चित्रकार (मृत्यू: ४ आक्टोबर १६६९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४ : डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (१९५५) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुण्यातील के. इ. एम. रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, दैनिक सकाळ, इंडिया फांउंडेशन इ.संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)
१९९९ : इंदुताई टिळक – सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????)
१९९९ : जगदीश गोडबोले – पर्यावरणवादी लेखक व सामाजिक कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)
१९९८ : ताराचंद परमार – गांधीवादी कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ? ? ????)
१९९१ : जगन्नाथराव जोशी – जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते (जन्म: ? ? १९२०)
१९६७ : नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ – गायक व नट (जन्म: २६ जून १८८८)
१९१९ : एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ आक्टोबर १८५२)
१९०४ : अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही. (जन्म: २९ जानेवारी १८६०)
१२९१ : रुडॉल्फ (पहिला) – जर्मनीचा राजा (जन्म: १ मे १२१८)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Tuesday, 25 February, 2014 12:49