हा या वर्षातील १२४ वा (लीप वर्षातील १२५ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९६ : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा पदके, एन. कुंजुरानीदेवीला दोन रौप्यपदके
१९९५ : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ’बॉम्बे’ चे ’मुंबई’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
१९९२ : संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
१९८९ : सर्व पंचायत समित्यांमधे महिलांसाठी ३० टक्‍के जागा राखीव ठेवल्या जातील, अशी पंतप्रधान राजीव गांधी यांनी घोषणा केली.
१९०४ : अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.
१८५४ : भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
१७९९ : श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८४ : मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू (मृत्यू: १६ मार्च २००७)
१९४५ : एन. राम – ज्येष्ठ पत्रकार
१९४२ : सत्यनारायण गंगाराम तथा सॅम पित्रोडा – भारतातील दूरसंचारसेवांचा विस्तार करण्यास कारणीभूत असलेले शास्त्रज्ञ, पंतप्रधानांचे विज्ञान व तंत्रज्ञानविषयक सल्लागार
१९४० : रॉबिन कूक – इंग्लिश कादंबरीकार
१९३४ : अरुण दाते – भावगीत गायक
१९२९ : वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम – गुप्तहेरकथालेखक (मृत्यू: २० आक्टोबर २००९)
१९२९ : ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी, ’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. (मृत्यू: २० जानेवारी १९९३)
१९२८ : होस्‍नी मुबारक – इजिप्तचे चौथे राष्ट्राध्यक्ष
१८४९ : ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक, नाटककार, संगीतकार, चित्रकार व संपादक, रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगालीत भाषांतर केले (मृत्यू: ४ मार्च १९२५ - रांची, झारखंड)
१८४७ : महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन – धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्‍नेही (मृत्यू: २ फेब्रुवारी १९१७)
१८२५ : थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा खरा समर्थक (मृत्यू: २९ जून १८९५ - इस्ट्बोर्न, इंग्लंड)
१७६७ : त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार (मृत्यू: ६ जानेवारी १८४७)
१६४९ : छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा (मृत्यू: २० डिसेंबर १७३१)
१००८ : ख्वाजा अब्दूल्ला अन्सारी – पर्शियन सूफी संत (मृत्यू: ?? १०८८)
१००८ : हेन्‍री (पहिला) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ४ ऑगस्ट १०६०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८ : किशन महाराज – तबलावादक (जन्म: ३ सप्टेंबर १९२३)
१९८० : अनंत काणेकर – चतुरस्त्र साहित्यिक, कवी व पत्रकार, ’पद्मश्री’ व ’सोविएत लँड नेहरू पुरस्कार’ विजेते. मुंबईतील ’नाट्यमन्वंतर’ या प्रयोगशील नाट्यसंस्थेचे ते एक संस्थापक होते. (जन्म: २ डिसेंबर १९०५)
१९८० : जोसेफ टिटो – क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: ७ मे १८९२)
१७९९ : [चैत्र व. १५ शके १७२१] हैदरअलीचा थोरला मुलगा व मैसूरचा वाघ, शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान इंग्रजांबरोबर झालेल्या लढाईत ठार झाला. (जन्म: २० नोव्हेंबर १७५०)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 27 February, 2014 14:23