हा या वर्षातील ३३१ वा (लीप वर्षातील ३३२ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९५ : पाँडेचरीमधील ’व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर’ मधील शात्रज्ञांनी शोधलेले ’थोम्ब्रिनेज’ हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.
१९९५ : गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर
१९४४ : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.
१८३९ : बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे ’अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन’ची स्थापना

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८६ : सुरेश रैना – क्रिकेटपटू
१९४० : ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ (मृत्यू: २० जुलै १९७३)
१९१५ : दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ’फॉर हूम द बेल टोल्स‘ या कादंबरीचा ’घणघणतो घंटानाद’ हा त्यांनी केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे. (मृत्यू: २९ जून १९८१)
१९०७ : हरिवंशराय बच्‍चन – हिन्दी कवी (मृत्यू: १८ जानेवारी २००३)
१८८१ : डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (मृत्यू: ४ ऑगस्ट १९३७)
१८७४ : चेम वाइझमॅन – इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९५२)
१८७० : दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस – इतिहास संशोधक (मृत्यू: ? ? ????)
१८५७ : सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२) ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ (मृत्यू: ४ मार्च १९५२ - इस्ट्बोर्न, ससेक्स, लंडन, इंग्लंड)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८ : विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे (जन्म: २५ जून १९३१)
२००० : बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, ’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक (जन्म: २६ मार्च १९०९)
१९९४ : दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित – स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी विचारवंत, आमदार आणि ’रायगड मिलिटरी स्कूल’चे संस्थापक (जन्म: २८ मे १९०७ - महाड, रायगड)
१९७८ : लक्ष्मीबाई केळकर – राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका (जन्म: ६ जुलै १९०५)
१९७६ : गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार (जन्म: २८ डिसेंबर १८९९)
१९५२ : शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार (जन्म: २३ आक्टोबर १८७९)
१७५४ : अब्राहम डी. मुआव्हर – फ्रेन्च गणिती (जन्म: २६ मे १६६७)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 13 January, 2014 14:24