हा या वर्षातील १७९ वा (लीप वर्षातील १८० वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९८ : संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍कविषय्क सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.
१९९७ : मुष्टियुद्धात इव्हान्डर होलिफिल्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माईक टायसनला निलंबित करुन होलिफिल्डला विजेता घोषित करण्यात आले.
१९९४ : विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल करण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती.
१९७८ : अमेरिकेतील सर्वोच्‍व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
१९७२ : दुसर्‍या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ
१८४६ : अ‍ॅडॉल्फ सॅक्स याने पॅरिस, फ्रान्समधे ’सॅक्सोफोन’ या वाद्याचे पेटंट घेतले.
१८३८ : इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७० : मुश्ताक अहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू व प्रशिक्षक
१९३७ : डॉ. गंगाधर पानतावणे – साहित्यिक व समीक्षक
१९३४ : रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे वादग्रस्त कसोटीपटू (मृत्यू: १८ जुलै २००१)
१९२८ : बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)
१९२१ : नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)
१७१२ : रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (मृत्यू: २ जुलै १७७८)
१४९१ : हेन्‍री (आठवा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २८ जानेवारी १५४७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००० : विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही. एम.’ तथा दादासाहेब जोग – उद्योजक (जन्म: ६ एप्रिल १९२७)
१९९९ : रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ – स्वातंत्र्यसैनिकांचे नेते व झुंजार पत्रकार (जन्म: ? ? ????)
१९८७ : पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (जन्म: ३० जानेवारी १९११)
१९७२ : प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक (जन्म: २९ जून १८९३)
१८३६ : जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १६ मार्च १७५१)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 12 December, 2013 21:43