हा या वर्षातील १७८ वा (लीप वर्षातील १७९ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९६ : अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर
१९९१ : युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
१९७७ : जिबुटी (Dijbouti) ला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९५४ : अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता: ५००० किलो वॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.
१९५० : अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३९ : राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)
१९१७ : खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज (मृत्यू: ११ आक्टोबर १९८४)
१८८० : हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (मृत्यू: १ जून १९६८)
१८७५ : दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’ (मृत्यू: १३ मार्च १८९९)
१८६४ : शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)
१८३८ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)
१५५० : चार्ल्स (नववा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ३० मे १५७४)
१४६२ : लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १ जानेवारी १५१५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८ : फील्ड मार्शल सॅम माणेकशा (जन्म: ३ एप्रिल १९१४)
२००० : द. न. गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार (जन्म: ? ? ????)
१९९८ : होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)
१९९६ : अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (जन्म: ५ एप्रिल १९०९)
१८३९ : महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)
१७०८ : धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती (जन्म: ? ? १६५०)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 14 March, 2014 15:02