हा या वर्षातील १२३ वा (लीप वर्षातील १२४ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९९ : होनोलूलू येथील एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय वृद्ध गृहस्तांनी १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
१९९४ : सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील ‘अफ्रिकन नॅशनल काँग्रेस’ या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण अफ्रिकेत वांशिक तत्त्वावर निवडणूका होत असत.
१९७३ : शिकागो येथील १४५१ फूट उंच असलेली ’सिअर्स टॉवर’ ही (त्याकाळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.
१९४७ : इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना.
१९३९ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
१९१३ : दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला ’राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित होऊन भारतीय चित्रपट उद्योगाची सुरूवात झाली.
१८०२ : वॉशिंग्टन (डि. सी) या शहराची स्थापना झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५१ : अशोक गहलोत – राजस्थानचे मुख्यमंत्री
१९५९ : उमा भारती – मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री
१८९८ : गोल्डा मायर – शिक्षिका व इस्त्रायलच्या ४ थ्या पंतप्रधान (मृत्यू: ८ डिसेंबर १९७८)
१८९६ : व्ही. के. कृष्ण मेनन – भारताचे संरक्षणमंत्री व मुत्सद्दी (मृत्यू: ६ आक्टोबर १९७४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११ : जगदीश खेबूडकर – गीतकार व कवी (जन्म: १० मे १९३२)
२००९ : राम शेवाळकर – मराठी साहित्यिक (जन्म: २ मार्च १९३१)
२००६ : प्रमोद महाजन – केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार (जन्म: ३० आक्टोबर १९४९)
२००० : शकुंतला परांजपे – कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका (जन्म: १७ जानेवारी १९०६)
१९९६ : वसंत गवाणकर – व्यंगचित्रकार (जन्म: ? ? ????)
१९८१ : फातिमा रशिद ऊर्फ ’नर्गिस’ – हिन्दी चित्रपट अभिनेत्री (जन्म: १ जून १९२९)
१९७८ : विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे – लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी (जन्म: १७ जानेवारी १८९५ - घोसपुरी, अहमदनगर)
१९७७ : हमीद दलवाई – मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)
१९७१ : डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (जन्म: १० एप्रिल १९०१)
१९६९ : डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न हे सन्मान त्यांना देण्यात आलो होते. ’जमिया मिलिया इस्लामिया’ या शिक्षण संस्थेचे संपादक पुढे ही संस्था विद्यापीठात रुपांतरित झाली. (जन्म: ८ फेब्रुवारी १८९७)
१९१२ : नझीर अहमद देहलवी ऊर्फ ’डिप्टी’ – ऊर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे ऊर्दू लेखक, समाजसुधारक (जन्म: ? ? १८३० - बिजनोर, उत्तर प्रदेश)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 27 January, 2014 18:38