-: दिनविशेष :-

२० मेEnroll for Standard 10 : Online Class

महत्त्वाच्या घटना:

२००१

चित्रपट निर्माते व लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे ‘चित्रभूषण पुरस्कार’ जाहीर

२०००

राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली.

१९९६

देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना ‘ऑनेस्ट मॅन ऑफ द’ इयर हा पुरस्कार जाहीर

१८७३

लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणे असलेल्या निळ्या ‘जीन्स’चे पेटंट घेतले.

१४९८

पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा हा ‘केप ऑफ गुड होप’ला वळसा घालून कालिकत बंदरात दाखल झाला. [वैशाख व. १४, शके १४२०]

५२६

सिरीया आणि अँटोचियात झालेल्या एका भूकंपात सुमारे ३,००,००० लोकांचा मृत्यू


Enroll for Standard 10 : Online Class

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५२

रॉजर मिला – कॅमेरुनचा फूटबॉलपटू

१९१५

मोशे दायान – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख
(मृत्यू: १६ आक्टोबर १९८१)

१९००

सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी
(मृत्यू: २८ डिसेंबर १९७७)

१८८४

पांडुरंग दामोदर गुणे – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९२२)

१८६०

एडवर्ड बकनर – आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: १३ ऑगस्ट १९१७)

१८५०

[वैशाख शु. ९ शके १७७२] विष्णूशास्त्री चिपळूणकर – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि ’केसरी’चे एक संस्थापक. चित्रशाळा, आर्यभूषण छापखाना, किताबघर यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले. [वैशाख शु. ९ शके १७७२]
(मृत्यू: १७ मार्च १८८२)


Enroll for Standard 10 : Online Class

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९७

माणिकराव लोटलीकर – इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील ‘विश्वकर्मा’
(जन्म: ? ? ????)

१९९४

के. ब्रम्हानंद रेड्डी – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि काँग्रेसचे अध्यक्ष
(जन्म: २८ जुलै १९०९)

१९९२

डॉ. लीला मूळगांवकर – सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक
(जन्म: १० आक्टोबर १९१६)

१९६१

भाई विष्णूपंत चितळे – कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते
(जन्म: ? ? ????)

१९३२

बिपिन चंद्र पाल – ‘लाल-बाल-पाल’ या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी
(जन्म: ७ नोव्हेंबर १८५८)

१८७८

कृष्णशास्त्री चिपळूणकर – समाजसुधारक व संस्कृत विद्वान
(जन्म: ? ? १८२४)

१७६६

मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी [वैशाख शु. ११ शके १६८८]
(जन्म: १६ मार्च १६९३)

१५७१

राघवचैतन्यांचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु, केशवचैतन्य ऊर्फ बाबाचैतन्य यांनी जुन्‍नरजवळील ओतूर येथे समाधी घेतली. [वैशाख व. १२, शके १४९३ प्रजापती संवत्सर]
(जन्म: ? ? ????)

१५०६

ख्रिस्तोफर कोलंबस – इटालियन दर्यावर्दी व संशोधक
(जन्म: ? आक्टोबर १४५१)


Pageviews

This page was last modified on 29 April 2021 at 8:53pm