हा या वर्षातील १५८ वा (लीप वर्षातील १५९ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००६ : अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.
२००४ : शिरोमणी अकाली दल (लोंगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना झाली.
२००१ : युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत टोनी ब्लेअरच्या नेतृत्त्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत
१९९४ : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ञ प्रभाकर नार्वेकर यांची नियुक्ती. या पदावर प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.
१९७९ : रशियातील कापुस्तिन यार येथुन ’भास्कर-१’ या दुसर्‍या भारतीय उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.
१९७५ : क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमधे सुरूवात झाली.
१९६५ : अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.
१८९३ : महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८१ : अ‍ॅना कुर्निकोव्हा – रशियन लॉन टेनिस खेळाडू
१९७४ : महेश भूपती – भारतीय लॉन टेनिस खेळाडू
१९४२ : मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा (मृत्यू: २० आक्टोबर २०११)
१९१७ : डीन मार्टिन – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते (मृत्यू: २५ डिसेंबर १९९५)
१९१४ : ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास – दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार (मृत्यू: १ जून १९८७)
१९१३ : मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष – लेखक व टीकाकार (मृत्यू: १९ एप्रिल २०१०)
१८३७ : अ‍ॅलॉइस हिटलर – अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील (मृत्यू: ३ जानेवारी १९०३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२ : बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती – भारताचे ५ वे उपराष्ट्रपती, पाँडेचरी व ओरिसाचे राज्यपाल आणि मैसूर प्रांताचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनामुळे जत्ती यांच्यावर राष्ट्रपतीपदाची जबाबदारी आली. पाच महिने ते हंगामी राष्ट्रपती होते. (जन्म: १० सप्टेंबर १९१२)
२००० : गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक, ’आनंद’ मासिकाचे संपादक, आकाशवाणीच्या ’बालोद्यान’ कार्यक्रमातील ’नाना’ (जन्म: २९ नोव्हेंबर १९०७)
१९७० : इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (जन्म: १ जानेवारी १८७९)
१९९२ : डॉ. सखाराम गंगाधर मालशे – लेखक, समीक्षक व संपादक. त्यांनी एकोणिसाव्या शतकावर लिहिलेली ’गत शतक शोधताना’ आणि ’तारतम्य’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. डॉ. धनंजय कीर यांच्या साहाय्याने त्यांनी ’महात्मा फुले समग्र वाङ्‍मय’ संपादित केले आहे.  (जन्म: २४ सप्टेंबर १९२१)
१९५४ : अ‍ॅलन ट्युरिंग – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ (जन्म: २३ जून १९१२)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 26 February, 2014 23:55