हा या वर्षातील ३६२ वा (लीप वर्षातील ३६३ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१८९५ : ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले. ल्युमिअर बंधू
१८८५ : मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना
१८४६ : आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले.
१८३६ : स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१६१२ : गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५२ : अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील
१९४५ : वीरेंद्र – नेपाळचे राजे (मृत्यू: १ जून २००१)
१९४० : ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री
१९३७ : रतन टाटा – उद्योगपती
१९३२ : धीरुभाई अंबानी – उद्योगपती (मृत्यू: ६ जुलै २००२)
१९२६ : हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२)
१९११ : फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले. (मृत्यू: १६ मे १९९४)
१८९९ : गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६)
१८५६ : वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००६ : प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: ३० सप्टेंबर १९३३)
२००० : मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (जन्म: २४ जानेवारी १९२४ - वेंगुर्ला)
१९८१ : हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले. (जन्म: ? ? १९०९)
१९७७ : सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी (जन्म: २० मे १९००)
१९३१ : आबालाल रहमान – चित्रकार (जन्म: ? ? १८६०)
१६६३ : फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २ एप्रिल १६१८)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 19 February, 2014 21:59