हा या वर्षातील १४५ वा (लीप वर्षातील १४६ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९९ : सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणार्‍या लाखो वारकर्‍यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.
१९९२ : विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना १९९१ चा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर
१९८१ : सौदी अरेबियातील रियाध येथे ’गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’ (GCC) या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.
१९७७ : चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.
१९६१ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.
१९५५ : कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्‍च शिखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
१९६३ : इथिओपियातील आदिसाबाबा येथे ’ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रिकन युनिटी’(OAU) ची स्थापनाझाली. ९ जुलै २००२ रोजी ही संघटना विसर्जित करण्यात आली.
१६६६ : शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३६ : रुसी सुरती – क्रिकेटपटू (मृत्यू: १३ जानेवारी २०१३)
१९२७ : रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक (मृत्यू: १२ मार्च २००१)
१८९९ : काझी नझरुल इस्लाम –  स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी. पश्चिम बंगालमधील असनसोल-दुर्गापूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्यात येणार आहे.  (मृत्यू: २९ ऑगस्ट १९७६)
१८९५ : त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६३)
१८८६ : रास बिहारी घोष – क्रांतिकारक (मृत्यू: २१ जानेवारी १९४५)
१८३१ : सर जॉन इलियट – भारतातील हवामानशास्त्रविषयक कार्यामुळे प्रसिद्धी पावलेले ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ. १८८७ ते १८९३ या कालावधीत ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख होते. (मृत्यू: १८ मार्च १९०८ - व्हार, फ्रान्स)
१८०३ : राल्फ वाल्डो इमर्सन – अमेरिकन लेखक व तत्वज्ञ (मृत्यू: २७ एप्रिल १८८२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००५ : सुनील दत्त – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री (जन्म: ६ जून १९२९)
१९९९ : बाळ दत्तात्रय तथा बी. डी. टिळक – संशोधक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक, राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष, शांतिस्वरुप भटनागर पारितोषिक विजेते, पी. सी. रे पारितोषिक विजेते (जन्म: ? ? १९१८ - कारंजा)
१९९८ : लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार (जन्म: ३ नोव्हेंबर १९३७)
१९५४ : गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक,  ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद (जन्म: ३१ डिसेंबर १८७८

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Sunday, 2 March, 2014 23:27