हा या वर्षातील ३०७ वा (लीप वर्षातील ३०८ वा) दिवस आहे.

       उत्तम प्रशिक्षण दिलेला कुत्रा सुमारे शंभर प्रकारच्या आज्ञा ऐकू शकतो. दुसर्‍या महायुद्धाच्या प्रारंभी हिटलरने ४० ते पन्नास हजार कुत्र्यांचे एक खास पथक उभारले होते. लष्करी साठयाची राखण करणे, छावणीत घुसणार्‍याचा माग काढणे व महत्त्वाचे निरोप पोचवणे ही त्यांची कामे होती. प्रशिक्षित कुत्रा

महत्त्वाच्या घटना:

१९८८ : श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले
१९५७ : रशियाच्या ’स्पुटनिक-२’ या अंतराळयानातून गेलेली ’लायका’ नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.
१९१८ : पोलंड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.
१९१३ : अमेरिकेत ’आय कर’ सुरू झाला.
१९०३ : पनामा (कोलंबियापासुन) स्वतंत्र झाला.
१८३८ : द टाइम्स ऑफ इंडिया’ हे जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश दैनिक ’द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ या नावाने मुंबईत सुरू झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५४ : लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)
१९३७ : लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार (मृत्यू: २५ मे १९९८)
१९३३ : अमर्त्य सेन – कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते (१९९८) अर्थशास्त्रज्ञ
१९२१ : चार्ल्स ब्रॉन्सन – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: ३० ऑगस्ट २००३)
१९०१ : पृथ्वीराज कपूर – अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २९ मे १९७२)
१६८८ : सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१४ :

सदाशिव दत्तात्रय अमरापूरकर – मराठी व हिंदी चित्रपटांतील अभिनेते. १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या २२ जून १८९७ या चित्रपटात लोकमान्य टिळकांची भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
(मृत्यू: ३ नोव्हेंबर २०१४)

सदाशिव अमरापूरकर

(Image Credit:  @FilmHistoryPic)

२०१२ : कैलाशपती मिश्रा – गुजरातचे राज्यपाल
(जन्म: ५ आक्टोबर १९२३)
२००० : प्रा. गिरी देशिंगकर – चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक
(जन्म: ? ? ????)
१९९८ : डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: १५ जानेवारी १९२०)
१९९२ : प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (जन्म: २१ नोव्हेंबर १९२६)
१९९० : मनमोहन कृष्ण – चरित्र अभिनेता
(जन्म: २६ फेब्रुवारी १९२२)
१८१९ : अनंत फंदी – शाहीर, ’फटका’कार, गोंधळी
(जन्म: ? ? १७४४)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 5 November, 2014 15:00