हा या वर्षातील २६९ वा (लीप वर्षातील २७० वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९० : रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९८४ : युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.
१९७३ : ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या ’काँकॉर्ड’ या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.
१९६० : फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.
१९५० : इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८१ : सेरेना विल्यम्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
१९४३ : इयान चॅपेल – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट कप्तान
१९३२ : डॉ. मनमोहन सिंग – भारताचे १३ वे पंतप्रधान, अर्थतज्ञ?
१९३१ : विजय मांजरेकर – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ आक्टोबर १९८३)
१९२३ : देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: ३ डिसेंबर २०११)
१८९४ : आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (मृत्यू: १० डिसेंबर १९५५)
१८८८ : टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ जानेवारी १९६५)
१८५८ : मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते (मृत्यू: १० आक्टोबर १८९८)
१८४९ : इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३६)
१८२० : इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्‍नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला. (मृत्यू: २९ जुलै १८९१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८ : पॉल न्यूमन – अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (जन्म: २६ जानेवारी १९२५)
२००२ : राम फाटक – गायक व संगीतकार (जन्म: २१ आक्टोबर १९१७)
१९९६ : विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (जन्म: ४ जानेवारी १९२४)
१९८९ : हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता (जन्म: १६ जून १९२०)
१९८८ : पण्डित शिवरामबुवा दिवेकर – हिन्दगंधर्व (जन्म: १ एप्रिल १९१२)
१९७७ : उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२) व फेलोशिप विजेते. त्यांनी अल्मोडा येथे ’इंडिया कल्चरल सेंटर’ची स्थापना केली. (जन्म: ८ डिसेंबर १९००)
१९५६ : लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक (जन्म: २० जून १८६९)
१९०२ : लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक (जन्म: २६ फेब्रुवारी १८२९)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 27 February, 2014 0:48