-: दिनविशेष :-

६ जून

UN Russian Language Day


महत्त्वाच्या घटना:

१९९३

मंगोलियात प्रथमच राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट निवडणूका घेण्यात आल्या.

१९८२

इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.

१९७४

स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.

१९७०

इंग्लंडमधे सी. हेन्केल या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा अपमार्जक साबण (Detergent Soap) विक्रीस उपलब्ध केला.

१९६९

वि. स. पागे समितीने केलेल्या शिफारशीवरुन रोजगार योजनेस सुरुवात झाली. १९७२ च्या भीषण दुष्काळात तिचे ‘रोजगार हमी योजना’ असे नामकरण करण्यात आले. जानेवारी १९७३ पासून या योजनेतील मजुरांना देण्यात येणारा पौष्टिक आहार ‘सुकडी’ या नावाने प्रसिद्ध झाला.

१९३०

गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना

१८८२

अरबी समुद्रात आलेल्या एका भीषण चक्रीवादळामुळे मुंबईत सुमारे १,००,००० लोक मृत्यूमुखी पडले.

१८३३

रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

१६७४

रायगड येथे छत्रपती शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५६

बियॉन बोर्ग – स्वीडीश लॉनटेनिस खेळाडू

१९२९

सुनील दत्त – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री
(मृत्यू: २५ मे २००५)

१९१९

राजेन्द्र कृष्ण – गीतकार कवी व पटकथालेखक
(मृत्यू: २३ सप्टेंबर १९८७)

१९०९

गणेश रंगो भिडे – मराठी ज्ञानकोशकार, लेखक आणि पत्रकार. भिडे यांनी ‘व्यावहारिक ज्ञानकोश’ (५ खंड), ‘अभिनव ज्ञानकोश’, ‘बालकोश’ अशा कोशांचे संपादन केले. ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर’, ‘फोटो कसे घ्यावेत’, ‘सावरकर सूत्रे’ आदी पुस्तकेही त्यांनी लिहिली. ‘सिनेमासृष्टी’ हे मराठीतील चित्रपट-नाट्य विषयक पहिले नियतकालिक १९३२ च्या सुमारास त्यांनी सुरू केले.
(मृत्यू: ८ जून १९८१)

१९०१

सुकार्नो – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २१ जून १९७०)

१८५०

कार्ल ब्राऊन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: २० एप्रिल १९१८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२

शांता शेळके – शब्दांवर मनापासून प्रेम करणार्‍या आणि आपल्या विविध भावभावनांचा अविष्कार अचूकपणे व्यक्त करणार्‍या समर्थ कवयित्री आणि गीतलेखिका. त्यांनी कथा, कादंबरी, कविता, चित्रपटगीते, भावगीते, नाट्यगीते, बालगीते, ललितलेखन व लघुनिबंध इत्यादि प्रकारांत विपुल लेखन केले. कालिदासाचे ‘मेघदूत’ आणि अनेक जपानी हायकूंचा त्यांनी अनुवाद केला. ‘वडीलधारी माणसे’ हे व्यक्तिचित्रण ‘गोंदण’, ‘वर्षा’, ‘रुपसी’ इ. काव्यसंग्रह, ‘रंगरेषा’, ‘आनंदाचे झाड’ इ. ललित लेखसंग्रह, ‘धूळपाटी’ हे आत्मचरित्र इ. त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांनी ७० ते ७५ चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत.
(जन्म: १२ आक्टोबर १९२२)

१९७६

जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist)
(जन्म: १५ डिसेंबर १८९२)

१९६१

कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ
(जन्म: २६ जुलै १८७५)

१९५७

रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक
(जन्म: ३ जुलै १८८६)

१८९१

जॉन ए. मॅकडोनल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान
(जन्म: ११ जानेवारी १८१५)


Pageviews

This page was last modified on 04 May 2021 at 12:25pm