हा या वर्षातील ७१ वा (लीप वर्षातील ७२ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ’यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला.
१९९९ : सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.
१९९९ : चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड ’नाटो’ (NATO) मधे सामील झाले.
१९९३ : मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी.
१९९२ : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.
१९९१ : जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी
१९६८ : मॉरिशस (इंग्लंडपासून) स्वतंत्र झाला.
१९३० : ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली.
१९१८ : रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.
१९१२ : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९१३ : यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४)
१९११ : दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर (जन्म: १२ ऑगस्ट १९७३)
१८९१ : ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते (मृत्यू:
१८२४ : गुस्ताव किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १७ आक्टोबर १८८७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००१ : रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक (जन्म: २५ मे १९२७)
१९९९ : यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (जन्म: २२ एप्रिल १९१६)
१९४२ : रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (जन्म: २३ सप्टेंबर १८६१)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 8 January, 2014 0:10