हा या वर्षातील ३६५ वा (लीप वर्षातील ३६६ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००४ : त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ - १०१ या इमारतीचे उद्‍घाटन झाले.
१९९९ : बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
१९९९ : पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
१९४४ : दुसरे महायुद्ध - हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१८७९ : थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
१८०२ : इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.
१६०० : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४८ : डोना समर – अमेरिकन गायिका (मृत्यू: १७ मे २०१२)
१९३७ : अँथनी हॉपकिन्स – वेल्श अभिनेता
१९१० : पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)
१८७१ : गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक,  ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद (मृत्यू: २५ मे १९५४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९७ : ’स्वरराज’ छोटा गंधर्व (जन्म: १० मार्च १९१८)
१९८६ : राजनारायण – केंद्रीय आरोग्य मंत्री (जन्म: ? ? १९१७)
१९७१ : डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)
???? : शाहीर पिराजीराव सरनाईक (जन्म: ? ? ????)
१९२६ : वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (जन्म: १२ जुलै १८६३)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 28 February, 2014 18:10