-: दिनविशेष :-

२८ नोव्हेंबर

समता दिन


महत्त्वाच्या घटना:

२०००

तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर

१९७५

पूर्व तिमोरला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९६७

जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी ‘स्पंदक’ (Pulsar) तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.

१९६४

नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.

१९६०

मॉरिटानियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९३८

‘प्रभात’चा ‘माझा मुलगा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. (कथा, पटकथा, संवाद: य. गो. जोशी, दिग्दर्शक: के. नारायण काळे, कलाकार: शाहू मोडक, शांता हुबळीकर, मामा भट, वसंत ठेंगडी, वत्सलाबाई जोशी, बालकराम, सुंदराबाई, मा. छोटू)

१८२१

पनामाचा ध्वज

पनामाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

(Image Credit: Wikipedia)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८७२

गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझे – ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार होते. वझेबुवांची धृपद, खयाल, ठुमरी आदि गायनप्रकारांवर हुकमत होती. बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, भालचंद्र पेंढारकर, हरिभाऊ घांग्रेकर हे त्यांचे काही नामांकित विद्यार्थी होत.
(मृत्यू: ५ मे १९४३)

१८५७

अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा
(मृत्यू: २५ नोव्हेंबर १८८५)

१८५३

हेलन व्हाईट

हेलन व्हाईट – डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला
(मृत्यू: २८ आक्टोबर १९४४)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

झिग झिगलर
२००९ मधील छायाचित्र

हिलरी हिंटन तथा ‘झिग’ झिगलर – अमेरिकन लेखक
(जन्म: ६ नोव्हेंबर १९२६)

(Image Credit: Wikipedia)

२००१

अनंत काणे – व्यावसायिक रंगभूमीवर दर्जेदार नाटकांच्या निर्मितीद्वारे आपला ठसा उमटवणारे निर्माते, ‘अभिजात’ या संस्थेच्या बॅनरखाली त्यांनी ‘गुंतता ह्रुदय हे’, ‘सूर राहू दे’, ‘सुरूंग’, ‘हसत हसत फसवुनी’, ‘मला भेट हवी हो’, ‘मन पाखरू पाखरू’, ‘धुक्यात हरवली वाट’, ‘गहिरे रंग’, ‘आनंदी गोपाळ’, ‘वर्षाव’ इ. दर्जेदार नाटकांची निर्मिती केली
(जन्म: ? ? ????)

१९९९

हनुमानप्रसाद मिश्रा – १९८८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक
(जन्म: ? ? १९१३)

१९६८

एनिड ब्लायटन – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका
(जन्म: ११ ऑगस्ट १८९७)

१९६७

पांडुरंग महादेव तथा ‘सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक
(जन्म: १२ नोव्हेंबर १८८०)

१९६३

त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक
(जन्म: २५ मे १८९५)

१९६२

कृष्ण चंद्र तथा ‘के. सी.’ डे – गायक, संगीत संयोजक व अभिनेते
(जन्म: ? ऑगस्ट १८९३)

१९५४

एनरिको फर्मी

एनरिको फर्मी – न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी १९३८ चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: २९ सप्टेंबर १९०१)

(Image Credit: The Nobel Prize)

१८९३

सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी
(जन्म: २३ जानेवारी १८१४)

१८९०

जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ‘महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विषेशत: समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत
(जन्म: ११ एप्रिल १८२७)



Pageviews

This page was last modified on 27 November 2021 at 6:04pm