हा या वर्षातील २४१ वा (लीप वर्षातील २४२ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९७४ : चौधरी चरणसिंग यांनी ’भारतीय लोक दल’ या राजकीय पक्षाची स्थापना केली.
१९४७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले.
१९१८ : लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
१८९८ : ’गुडईयर’ कंपनीची स्थापना झाली.
१८३३ : युनायटेड किंगडमने आपल्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
१८३१ : मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electromagnetic Induction) शोध लावला.
१८२५ : पोर्तुगालने ब्राझिलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१४९८ : वास्को द गामाने कालिकतहुन पोर्तुगालला परतण्याचा निर्णय घेतला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५८ : मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता (मृत्यू: २५ जून २००९)
१९२३ : रिचर्ड अ‍ॅटनबरो – इंग्लिश निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते
१९१५ : इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८२)
१९०५ : मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीपटू (मृत्यू: ३ डिसेंबर १९७९)
१९०१ : पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी (मृत्यू: २७ एप्रिल १९८०)
१८८० : लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे (मृत्यू: २६ जानेवारी १९६८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८ : जयश्री गडकर – अभिनेत्री (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)
२००७ : बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७)
१९८६ : गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: १५ जून १८९८)
१९८२ : इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री (जन्म: २९ ऑगस्ट १९१५)
१९७६ : काझी नझरुल इस्लाम –  स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी. पश्चिम बंगालमधील असनसोल-दुर्गापूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्यात येणार आहे.  (जन्म: २५ मे १८९९)
१९७५ : इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष  (जन्म: १४ आक्टोबर १८८२)
१९६९ : मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (जन्म: २० आक्टोबर १९१६)
१९०६ : बाबा पद्मनजी मुळे – ख्रिस्ती धर्मप्रसारक, ग्रंथकार व मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक (जन्म: ? मे १८३१)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Sunday, 2 March, 2014 23:28