हा या वर्षातील १३ वा दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००७ : के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९६ : पुणे - मुंबई दरम्यान ’शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.
१९६७ : पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.
१९६४ : कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार
१९५७ : हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्‍घाटन झाले.
१९५३ : मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी
१८९९ : गोविन्द बल्लाळ देवल यांच्या ’संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८३ : इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार
१९८२ : कमरान अकमल – पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९४९ : राकेश शर्मा – एकूण १३८ वा व पहिला भारतीय अंतराळवीर
१९३८ : पं. शिवकुमार शर्मा – प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार
१९२६ : शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू: ९ एप्रिल २००९)
१९१९ : एम. चेन्‍ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ - १९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ - १९८३), राजस्थानचे राज्यपाल (१९९२ - १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ - १९९६) (मृत्यू: २ डिसेंबर १९९६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१३ : रुसी सुरती – क्रिकेटपटू (जन्म: २५ मे १९३६)
२०११ : प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते (जन्म: १४ मार्च १९३१)
२००१ : श्रीधर गणेश दाढे – संस्कृत पंडित व लेखक. कालिदासाचे ’मेघदूत’ कवींद्र परमानंद यांचे ’शिवभारत’ यांचे पद्यमय अनुवाद त्यांनी केले आहेत. (जन्म: ? ? ????)
१९९८ : शंभू सेन – संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)
१९९७ : मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (जन्म: १५ एप्रिल १९१२)
१९८५ : मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: ? ? १९१५)
१९७६ : अहमद जाँ थिरकवा – सुप्रसिद्ध तबला वादक (जन्म: ? ? १८९२?)
१८३२ : थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 17 May, 2014 20:52