IPL 2013: धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने पुणे वॉरियर्स विरुद्ध खेळताना ३० चेंडूत शतक नोंदवण्याचा विक्रम केला.
(Image Credit: onthisday.com)
You Tube चा सहसंस्थापक जावेद करीम याने 'Me at the Zoo' हा You Tube वरील ‘पहिला’ व्हिडीओ upload केला.
SARS विषाणूच्या संसर्गामुळे बिंजिंग (चीन) मधील सर्व शाळा दोन आठवड्यांसाठी बंद करण्यात आल्या.
(Image Credit: onthisday.com)
नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश होऊन तो १६० वा सदस्य देश बनला.
हॉलंडमधील हार्लेम येथील १७७९ साली बांधलेली पवनचक्की जळून खाक झाली. २००२ मध्ये ही पवनचक्की पुन्हा बांधण्यात आली.
(Image Credit: विकिपीडिया )
दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले. [चैत्र व. ३]
लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि १९५७ चे नोबेल शांति पुरस्कार विजेते
(मृत्यू: २७ डिसेंबर १९७२)
(Image Credit: nobelprize.org)
महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक
(मृत्यू: २ जानेवारी १९४४)
(Image Credit: MPSC Today)
पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण
उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ‘आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित
(मृत्यू: ५ एप्रिल १९२२)
मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ
(मृत्यू: ४ आक्टोबर १९४७)
(Image Credit: विकिपीडिया)
जेम्स बुकॅनन – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १ जून १८६८)
(Image Credit: History Channel)
विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ १९९५ पासून आजचा दिवस हा ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
(मृत्यू: २३ एप्रिल १६१६)
(Image Credit: विकिपीडिया)
निरंजन भाकरे – भारूडरत्न, लोककलावंत. ‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ या भारुड सादरीकरणाने राज्यभर प्रसिद्ध झाले होते. भारुडाच्या माध्यमातून ते अवयवदानाविषयी जनजागृती करत असत.
(जन्म: ? ? १९५९)
(Image Credit: महाराष्ट्र टाइम्स)
बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष
(जन्म: १ फेब्रुवारी १९३१)
(Image Credit: विकिपीडिया)
जयंत श्रीधर तथा ‘जयंतराव’ टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि
शिकार इ. विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक
(जन्म: १२ आक्टोबर १९२१)
(Image Credit: बुक गंगा)
मराठी चित्रपटांना आधार मिळावा या ध्येयाने प्रेरित होऊन गेली ४० वर्षे लालबागमधील ‘भारतमाता’ चित्रपटगृह चालवणारे यशवंत सदाशिव ऊर्फ बाबासाहेब भोपटकर यांचे निधन
(जन्म: ? ? ????)
(Image Credit: @bombaywallah)
डेनिस कॉम्पटन – इंग्लिश क्रिकेटपटू, ‘गोल्डन बॉय’
(जन्म: २३ मे १९१८)
(Image Credit: विकिपीडिया)
शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक
(जन्म: १० आक्टोबर १८७१)
(Image Credit: विवेक: महाराष्ट्र नायक)
विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी. त्यांची ‘डॅफोडिल्स‘ ही अतिशय गाजलेली कविता आहे.
(जन्म: ७ एप्रिल १७७०)
विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ १९९५ पासून आजचा दिवस हा ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
(जन्म: २३ एप्रिल १६१६)
(Image Credit: विकिपीडिया )
This page was last modified on 22 December 2021 at 9:36pm