पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले.
स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने दिला.
रशियाच्या सोयुझ अंतराळयानातून भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.
भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली. यानंतर २४ वर्षांने म्हणजे १९९८ मध्ये भारताने दुसरी चाचणी केली.
दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
‘प्रभात’चा ‘संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.
(Image Credit: Indian Films and Posters)
‘प्रभात’चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.
(Image Credit: Wikipedia)
पूर्ण पणे भारतात बनवलेला मूकपट ‘पुंडलिक’ प्रदर्शित झाला.
नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट झाला.
वास्को-द-गामा भारतातील कालिकत बंदरात दाखल झाला.
एच. डी. देवेगौडा – भारताचे ११ वे पंतप्रधान
पोप जॉन पॉल (दुसरा)
(मृत्यू: २ एप्रिल २००५)
पुरुषोत्तम काकोडकर – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५ व्या लोकसभेचे सदस्य
(मृत्यू: २ मे १९९८)
बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार
(मृत्यू: २ फेब्रुवारी १९७०)
छत्रपती शाहू महाराज (मूळ नाव शिवाजी) – छत्रपती संभाजी व येसूबाई यांचे चिरंजीव [वैशाख व. ७, शके १६०७]
(मृत्यू: १५ डिसेंबर १७४९)
ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी
(मृत्यू: ४ डिसेंबर ११३१)
वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई. चा संस्थापक
(जन्म: २६ नोव्हेंबर १९५४)
रामचंद्र सप्रे – पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते
(जन्म: ? ? ????)
कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार. ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या मूकपटात त्यांनी भूमिका केली होती. त्यांचे चिरंजीव चंद्रकांत गोखले व नातू विक्रम गोखले अशा तीन पिढ्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले.
(जन्म: ६ सप्टेंबर १९०१)
(Image Credit: Wikipedia)
पंचानन माहेश्वरी – सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ
(जन्म: ९ नोव्हेंबर १९०४)
बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह, १८३२ मधे ‘दर्पण’ हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. ‘दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले.
(जन्म: ६ जानेवारी १८१२)
This page was last modified on 02 September 2021 at 5:42pm