ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते 'लोकसंस्कृती'चे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना 'पुण्यभूषण पुरस्कार' पुण्यात देण्यात आला.
चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे हाती घेतली. त्या सिक्कीममधील आदिवासी समाजातील असून १९६४ च्या बॅचमधील आय. ए. एस. अधिकारी आहेत.
व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
कलकत्ता येथील ‘टेक्निशियन आय’ हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
‘आलम आरा’ हा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
पॅन अॅम या अमेरिकन विमानकंपनीची स्थापना झाली. १९ ऑक्टोबर १९२७ रोजी तिच्या कामकाजास सुरुवात झाली आणि ४ डिसेंबर १९९१ रोजी या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
साधना घाणेकर ऊर्फ ‘साधना सरगम’ – पार्श्वगायिका
मायकेल केन – ब्रिटिश अभिनेता
प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते
(मृत्यू: १३ जानेवारी २०११)
अल्बर्ट आइनस्टाईन – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-अमेरिकन भौतिकशात्रज्ञ
(मृत्यू: १८ एप्रिल १९५५)
गोविंद विनायक तथा ‘विंदा’ करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ‘अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान,जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले. विंदांचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस. आय. ई. एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ. स. १९८१ सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हेसुद्धा सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत. विंदानी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला.
(जन्म: २३ ऑगस्ट १९१८)
कवी सुरेश भट
(जन्म: १५ एप्रिल १९३२)
दादा कोंडके – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक
(जन्म: ८ ऑगस्ट १९३२)
जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक
(जन्म: १२ जुलै १८५४)
कार्ल मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते
(जन्म: ५ मे १८१८)
This page was last modified on 22 August 2021 at 8:23pm