-: दिनविशेष :-

६ ऑगस्ट

अणूबॉम्ब निषेध दिन

हिरोशिमा दिन


महत्त्वाच्या घटना:

१९९७

कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.

१९९४

डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ’इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार’ प्रदान

१९९०

कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.

१९६२

जमैकाला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९६०

अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.

१९४५

अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणूबॉम्ब टाकला. यात ७०,००० जण तात्काळ मृत्यूमुखी पडले तर पुढील अनेक वर्षे लोकांवर किरणोत्सर्गाचा परिणाम झाला.

१९४०

सोविएत युनियनने इस्टोनियाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला.

१९२६

जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.

१९१४

पहिले महायुद्ध – सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७०

एम. नाईट श्यामलन – भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक

१९२५

योगिनी जोगळेकर

योगिनी जोगळेकर – लेखिका, ४५ कादंबर्‍या, ४ कवितासंग्रह, ४ नाटके, १२ कुमार वाङ्‍मयाची पुस्तके इ. त्यांची साहित्य संपदा आहे.
(मृत्यू: १ नोव्हेंबर २००५)

(Image Credit: Prabook)

१८८१

अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ
(मृत्यू: ११ मार्च १९५५)

१८०९

लॉर्ड टेनिसन – इंग्लिश कवी
(मृत्यू: ६ आक्टोबर १८९२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९

कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते
(जन्म: ४ जानेवारी १९४१ – सेमरी जमालपूर, माऊ, उत्तर प्रदेश)

१९९७

वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक
(जन्म: १४ आक्टोबर १९२४)

१९९१

शापूर बख्तियार – ईराणचे शेवटचे पंतप्रधान. यानंतर इराणमध्ये हुकूमशाही स्थापित झाली.
(जन्म: २६ जून १९१४)

१९६५

वसंत पवार – संगीतकार (सांगत्ये ऐका, पठ्ठे बापूराव, बाळा जो जो रे, चिमणी पाखरे, अवघाची संसार, मानिनी, वैजयंता, पसंत आहे मुलगी, धाकटी जाऊ, सवाल माझा ऐका, मल्हारी मार्तंड इ. अनेक चित्रपट)
(जन्म: ? ? ????)

१९२५

सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते, ‘राष्ट्रगुरू’
(जन्म: १० नोव्हेंबर १८४८)



Pageviews

This page was last modified on 31 October 2021 at 8:51pm