-: दिनविशेष :-

१६ मे


महत्त्वाच्या घटना:

२००७

निकोलस पॉल स्टीफन सारकॉझी तथा निकोलस सारकॉझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले. (कार्यकाल: १६ मे २००७ ते १५ मे २०१२)

२००५

कुवेतमधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.

२०००

बॅडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या क्‍वालालंपूर येथील बैठकीत घेण्यात आला. मात्र २००६ मधे हा नियम परत बदलला गेला.

१९९६

भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ टिकले आणि १ जून १९९६ रोजी त्यांनी राजीनामा दिला.

१९९३

बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.

१९७५

सिक्कीम भारतात विलीन झाले.

१९७५

जपानची जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.

१९६२

कोयना जलविद्युत प्रकल्पाचा ७० मेगावॅट विद्यतु निर्मिती क्षमता असलेला पहिला टप्पा कार्यान्वित झाला. याचे पुढे अनेक टप्पे होऊन आता या प्रकल्पाची विद्युत निर्मिती क्षमता १९६० मेगावॅट एवढी आहे.
 फिल्म्स डिव्हिजन ने या प्रकल्पावर तयार केलेला माहितीपट पहा (१०:३८):

१९२९

हॉलिवूडच्या ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्‌स अँड सायन्सेस’या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ‘ऑस्कर’ असे नाव पडले.

१८९९

क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी

१६६५

पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्‍नात मुरारबाजीचा मृत्यू

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७०

गॅब्रिएला सॅबातिनी

गॅब्रिएला सॅबातिनी – अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू

(Image Credit: tennisnet.com)

१९३१

के. नटवर सिंह – भारतीय राजकारणी व परराष्ट्रमंत्री, आय. एफ. एस.

१९२६

माणिक वर्मा – शास्त्रीय संगीत व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांत लोकप्रियता मिळवलेल्या गायिका. ‘वंदे मातरम’, ‘सीता स्वयंवर’, ‘मायाबाजार’, ‘गुळाचा गणपती’, ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले. ‘वाजई पावा गोविंद’, ‘त्या चित्तचोरट्याला’, ‘अमृताहुनी गोड’ इ. त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत.
(मृत्यू: १० नोव्हेंबर १९९६)

१९०५

हेन्‍री फोंडा – अमेरिकन अभिनेते
(मृत्यू: १२ ऑगस्ट १९८२)

१९०२

करमसीभाई जेठाभाई सोमय्या – उद्योगपती
(मृत्यू: ९ मे १९९९)

१८२५

केरुनाना लक्ष्मण छत्रे – आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य
(मृत्यू: १९ मार्च १८८४)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१४

रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पद्मभूषण (१९८९)
(१७ जानेवारी १९१८)

१९९४

फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले.
(जन्म: २८ डिसेंबर १९११ - फरिदपूर, बांगला देश)

१९५०

अण्णासाहेब लठ्ठे

अण्णासाहेब बाबाजी लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री, मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री, रावबहादूर (१९२४), दिवाणबहादूर (१९३०) व करवीररत्न (१९४७) या पुरस्कारांनी गौरवान्वित
(जन्म: ९ डिसेंबर १८७८ - कुरुंदवाड, कोल्हापूर)

(Image Credit: मराठी विश्वकोश)

१८३०

जोसेफ फोरियर – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: २१ मार्च १७६८)



Pageviews

This page was last modified on 08 December 2021 at 9:58pm