चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर
अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना ‘महापृथ्वी’ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
(Image Credit: IMDb)
जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले. यात रुग्ण, डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता.
प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ‘भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.
फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना
जयप्रकाश नारायण यांनी ‘काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली.
फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.
बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान
(कार्यकाल: ३१ मार्च २००९ ते १३ जून २०२१)
(Image Credit: Wikipedia)
राजा मुजफ्फर अली – चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते
एडसन अरांतेस डो नासिमेंटो उर्फ ‘पेले’ – ब्राझीलचा फुटबॉलपटू
शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता
(मृत्यू: १४ ऑगस्ट २०११)
धर्मभास्कर गं. ना. कोपरकर – वैदिक धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन त्या संदर्भाचे लेखन, प्रकाशन, प्रचार व संशोधन त्यांनी केले. चार वेद, सहा शास्त्रे, मनुस्मृती, याज्ञवल्कस्मृती व इतर अनेक असे धर्म या विषयावर १९७ ग्रंथ त्यांनी लिहीले. त्यांना द्वारकापीठाच्या शंकराचार्यांकडून ‘धर्मभास्कर’ तर करवीरपीठाच्या शंकराचार्यांकडून ‘धर्मऋषी’ या पदव्या मिळाल्या होत्या.
राम फाटक – गायक व संगीतकार
(मृत्यू: २६ सप्टेंबर २००२)
अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते
(मृत्यू: १० डिसेंबर १८९६)
यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते
(जन्म: २७ सप्टेंबर १९३२)
(Image Credit: REUTERS / Punit Paranjpe)
लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका
(जन्म: ९ एप्रिल १९२५)
दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी
(जन्म: ३१ जानेवारी १८९६ - धारवाड, कर्नाटक)
मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार
(जन्म: २४ मार्च १७७५)
चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: १६ सप्टेंबर १३८०)
This page was last modified on 21 October 2021 at 2:54pm