-: दिनविशेष :-

२९ नोव्हेंबर

International Day of Solidarity with the Palestinian People


महत्त्वाच्या घटना:

२०००

शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना ‘उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार’ जाहीर

२०००

दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस ‘गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर

१९९६

नोबेल पारितोषिकविजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार ‘गोल्डन ऑनर’ जाहीर

१९६३

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी ‘वॉरन समिती’ नेमली.

१९४५

युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७७

युनिस खान

युनिस खान – पाकिस्तानी क्रिकेटपटू व फलंदाजी प्रशिक्षक

(Image Credit: Dawn)

१९३२

जाक्स शिराक – फ्रान्सचे २२ वे राष्ट्रपती (कार्यकाल: १७ मे १९९५ ते १६ मे २००७), फ्रान्सचे पंतप्रधान (१९७४ - १९७६, १९८६ - १९८८), पॅरिसचे महापौर (१९७७ - १९९५)
(मृत्यू: २६ सप्टेंबर २०१९)

१९२६

प्रभाकर नारायण ऊर्फ ‘भाऊ’ पाध्ये – लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते
(मृत्यू: ३० आक्टोबर १९९६)

१९०७

गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक, ‘आनंद’ मासिकाचे संपादक, आकाशवाणीच्या ‘बालोद्यान’ कार्यक्रमातील ‘नाना’
(मृत्यू: ७ जून २०००)

१८६९

अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ‘ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक
(मृत्यू: २० जानेवारी १९५१)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००१

जॉर्ज हॅरिसन – ‘बीटल्स’चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक
(जन्म: २५ फेब्रुवारी १९४३)

१९९३

जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ‘जे. आर. डी.’ टाटा – भारतरत्‍न, उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक
(जन्म: २९ जुलै १९०४)

१९५९

‘रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई – मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार
(जन्म: १७ मे १८६५)

१९३९

माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ‘माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते
(जन्म: २१ जानेवारी १८९४)

१९२६

कृष्णाजी नारायण आठल्ये – ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, ‘केरळ कोकिळ’ या मासिकाचे संस्थापक व संपादक
(जन्म: ३ जानेवारी १८५३ - टेंभू, सातारा, महाराष्ट्र)Pageviews

This page was last modified on 16 May 2021 at 9:31pm