-: दिनविशेष :-

२४ मे

राष्ट्रकुल दिन

जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिन


महत्त्वाच्या घटना:

२०००

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला ‘इन्सॅट-३बी’ हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण

१९९४

२६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

१९९१

एरिट्रियाला (इथिओपियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९७६

ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.

१८८३

न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.

१८४४

तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.

१६२६

पीटर मिन्युईटने स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५५

राजेश रोशन
२०११ मधील छायाचित्र

राजेश रोशन नागरथ तथा राजेश रोशन – संगीतकार आणि संगीत संयोजक. कुंवारा बाप (१९७४), ज्यूली (१९७५), देस परदेस, मनपसंद, लूटमार, मामा भांजा, दुसरा आदमी, मुकद्दर, स्वामी, प्रियतमा, ये हैं ज़िन्दगी, एक ही रास्ता, स्वर्ग नरक, इन्कार, खट्टा मीठा, बातों बातों में, दो और दो पाँच, कामचोर, हमारी बहू अलका, जाग उठा इन्सान, घर संसार, जनता हवालदार, निशान, बाबू, आखिर क्यों?, करण अर्जुन, सबसे बडा खिलाडी, पापा कहते हैं, कोयला, कहो ना प्यार हैं इ. अनेक चित्रपटांचे संगीतकार. मात्र त्यांची अनेक लोकप्रिय गाणी इतर देशांतील गाण्यांवर बेतलेली आहेत असं त्याचे टीकाकार म्हणतात.

(Image Credit: Wikipedia)

१९४२

माधव गाडगीळ

माधव धनंजय गाडगीळ – जागतिक कीर्तीचे पर्यावरणतज्ञ, जीवशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ, विद्याव्यासंगी. ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ (CES) चे संस्थापक, बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील प्राध्यापक, अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक, स्टॅनफर्ड आणि बर्कले विद्यापीठांचे ते पाहुणे प्राध्यापक, पद्मश्री (१९८१), पद्मभूषण (२००६), शांति स्वरूप भटनागर विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार, कर्नाटक सरकारचा राज्योत्सव प्रशस्ती पुरस्कार, हार्वर्ड सेंटेनिअल पदक, व्हॉल्व्हो पर्यावरण पुरस्कार (२००३), एच. के. फिरोदिया पुरस्कार (२००७), विक्रम साराभाई पुरस्कार, ईश्वर चंद्र विद्यासागर पुरस्कार, टायलर पुरस्कार (२०१५) इ. अनेक पुरस्कारांनी सन्मानित.

(Image Credit: Wikipedia)

१९३३

हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक
(मृत्यू: १९ डिसेंबर १९९९)

१९२४

रघुवीर भोपळे ऊर्फ ‘जादूगार रघुवीर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार. त्यांनी ‘फिरता जादूगार’ व ‘मी पाहिलेला रशिया’ ही पुस्तके लिहिली आहेत.
(मृत्यू: २० ऑगस्ट १९८४)

१८१९

व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी
(मृत्यू: २२ जानेवारी १९०१)

१६८६

डॅनियल फॅरनहाइट – जर्मन शास्त्रज्ञ
(मृत्यू: १६ सप्टेंबर १७३६)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०००

मजरुह सुलतानपुरी

असरार उल हसन खान उर्फ मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९९४) शायर, गीतकार आणि कवी
(जन्म: १ आक्टोबर १९१९)

(Image Credit: rekhta.org)

१९९९

विजयपाल लालाराम तथा ‘गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक
(जन्म: १५ मार्च १९०१)

१९९५

हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान
(जन्म: ११ मार्च १९१६)

१९९३

बुलो सी. रानी

बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी – जुन्या पिढीतील संगीतकार व गायक
(जन्म: ६ मे १९२० - हैदराबाद)

(Image Credit: IMDb)

१५४३

निकोलस कोपर्निकस – सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ
(जन्म: १९ फेब्रुवारी १४७३)



Pageviews

This page was last modified on 29 September 2021 at 2:53pm