-: दिनविशेष :-

२५ मे


महत्त्वाच्या घटना:

१९९९

सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणार्‍या लाखो वारकर्‍यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.

१९९२

विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना १९९१ चा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर

१९८१

सौदी अरेबियातील रियाध येथे ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’ (GCC) या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.

१९७७

चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.

१९६१

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.

"I believe that this nation should commit itself to achieving the goal, before this decade is out, of landing a man on the moon and returning him safely to the earth."
- President Kennedy's historic speech

केनेडी यांचे ऐतिहासिक भाषण

(Image Credit: NASA)

१९५५

कांचनगंगा

कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्‍च शिखर (८५८६ मीटर) प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.

(Image Credit: kimkim.com)

१९६३

इथिओपियातील आदिसाबाबा येथे ‘ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रिकन युनिटी’ (OAU) ची स्थापनाझाली. ९ जुलै २००२ रोजी ही संघटना विसर्जित करण्यात आली.

१६६६

छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत. MPSC

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३६

रुसी सुरती – क्रिकेटपटू
(मृत्यू: १३ जानेवारी २०१३)

१९२७

रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक
(मृत्यू: १२ मार्च २००१)

१८९९

काझी नझरुल इस्लाम –  स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी. पश्चिम बंगालमधील असनसोल-दुर्गापूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
(मृत्यू: २९ ऑगस्ट १९७६)

१८९५

त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक
(मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६३)

१८८६

रास बिहारी घोष

रास बिहारी घोष – क्रांतिकारक. १९४२ मध्ये टोकियो येथे त्यांनी घेतलेल्या एका परिषदेत ‘इंडियन इंडिपेडन्स लीग’ ची स्थापना केली. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र दल उभारण्याची गरज आहे अशी त्यांची भूमिका होती. यातूनच पुढे ‘इंडियन नॅशनल आर्मी’ उदयास आली.
(मृत्यू: २१ जानेवारी १९४५ - टोकियो, जपान) MPSC

(Image Credit: Wikipedia)

१८३१

सर जॉन इलियट – भारतातील हवामानशास्त्रविषयक कार्यामुळे प्रसिद्धी पावलेले ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ. १८८७ ते १८९३ या कालावधीत ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख होते.
(मृत्यू: १८ मार्च १९०८ - व्हार, फ्रान्स)

१८०३

राल्फ वाल्डो इमर्सन – अमेरिकन लेखक व तत्वज्ञ
(मृत्यू: २७ एप्रिल १८८२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००५

सुनील दत्त – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री
(जन्म: ६ जून १९२९)

१९९९

बाळ दत्तात्रय तथा बी. डी. टिळक – संशोधक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक, राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष, शांतिस्वरुप भटनागर पारितोषिक विजेते, पी. सी. रे पारितोषिक विजेते
(जन्म: २६ सप्टेंबर १९१८ - कारंजा)

१९९८

लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार
(जन्म: ३ नोव्हेंबर १९३७)

१९५४

गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद
(जन्म: ३१ डिसेंबर १८७८



Pageviews

This page was last modified on 25 May 2021 at 11:00pm