-: दिनविशेष :-

२८ मे


महत्त्वाच्या घटना:

१९९८

बलुचिस्तानच्या चगाई भागात पाकिस्तानने पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.

१९६४

‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन’ (PLO) ची स्थापना झाली.

१९५८

७५ व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.

  त्यांच्या ६१ व्या वाढदिवसालाही त्यांचा मुंबईत गोवालिया टॅंक मैदानावर सार्वजनिक सत्कार झाला होता. त्याची दुर्मिळ चित्रफीत ↓:

१९५२

ग्रीसमधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.

१९४८

ग्वाल्हेर संस्थान मध्य भारत संघात (Central Provinces) विलीन झाले. पुढे १ नोव्हेंबर १९५६ पासून ग्वाल्हेर संस्थानचा भूभाग मध्य प्रदेश राज्यात समाविष्ट झाला.

१९४०

दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९३७

नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले.

१९३७

व्होल्क्सवॅगन’ या जर्मन कंपनीची स्थापना झाली.

१४९०

मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली. याची राजधानी पुढे अहमदनगर येथे हलवण्यात आली आणि अहमदनगरची निजामशाही अस्तित्त्वात आली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२३

एन. टी. रामाराव
शावुकारू (१९५०) या चित्रपटात

नंदमुरी तारक तथा एन. टी. रामाराव – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व (अविभाजित) आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री, पद्मश्री (१९६८)
(मृत्यू: १८ जानेवारी १९९६)

(Image Credit: Wikipedia)

१९२१

पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, ‘पायोजी मैने रामरतन धन पायो’, ‘ठुमक चलत रामचंद्र’, ‘चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. ‘सुध मुद्रा, सुध बानी’ हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत. गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे ते वडील होत.
(मृत्यू: २५ आक्टोबर १९५५)

१९०८

इयान फ्लेमिंग – दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि ‘जेम्स बाँड’चा जनक
(मृत्यू: १२ ऑगस्ट १९६४)

१९०७

दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित – स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी विचारवंत, आमदार आणि ‘रायगड मिलिटरी स्कूल’चे संस्थापक
(मृत्यू: २७ नोव्हेंबर १९९४)

१९०३

शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ. त्यांचे ‘Cactus and Roses’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
(मृत्यू: २४ एप्रिल १९९४)

१८८३

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर – महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक [वैशाख व. ६, शके १८०५]
(मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६)

१६६०

जॉर्ज (पहिला) – इंग्लंडचा राजा. याला इंग्लिश आजिबात येत नसे व तो दुभाषांमार्फत दरबार्‍याशी संपर्क साधत असे किंवा लॅटिनमध्ये त्याचे म्हणणे मांडत असे.
(मृत्यू: ११ जून १७२७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९४

हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचे निधन.
(जन्म: ? ? ????)

१९८२

बळवंत दामोदर ऊर्फ कित्तेवाले निजामपूरकर – महाराष्ट्रातील अनेक शाळांमधून त्यांचे कित्ते लावले गेले. त्यातुन ते घराघरांत पोचले. म्हणून त्यांना ‘कित्तेवाले’ ही उपाधी मिळाली.
(जन्म: ? ? ????)

१९६१

परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत.
(जन्म: ११ जुलै १८९१)

१७८७

लिओपोल्ड मोत्झार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक आणि जगप्रसिद्ध वूल्फगँग मोत्झार्टचे वडील
(जन्म: १४ नोव्हेम्बर १७१९)



Pageviews

This page was last modified on 28 May 2021 at 7:44pm