-: दिनविशेष :-

३१ डिसेंबर


महत्त्वाच्या घटना:

२००४

तैपेइ-१०१

(त्याकाळी) जगात सर्वात उंच असलेल्या (वास्तुशास्त्रीय उंची: १६६७ फूट), तैवानमधील तैपेइ-१०१ या इमारतीचे उद्‍घाटन झाले. ३१ जानेवारी १९९९ रोजी या इमारतीचा कोनशिला समारंभ झाला आणि ३१ जुलै १९९९ रोजी प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली. मलेशियातील क्वालालम्पूरमधील पेट्रोनास टॉवर्स या इमारतीला मागे टाकून ही जगातील सर्वात उंच इमारत बनली. पुढे जवळपास सहा-सात वर्षे हा विक्रम अबाधित होता. दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीने नंतर हा मान पटकावला. उंच इमारतींच्या बाबतीत जगात ती सद्ध्या १० व्या क्रमांकावर आहे.

(Image Credit: skyscrapercenter.com)

१९९९

बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

१९९९

पनामा कालवा

पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.

(Image Credit: Hurtigruten Expeditions)

१९४४

दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१८७९

थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.

१८०२

इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.

१६००

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४८

डोना समर – अमेरिकन गायिका
(मृत्यू: १७ मे २०१२)

१९३७

अँथनी हॉपकिन्स – वेल्श अभिनेता

१९१०

पं. मल्लिकार्जुन मन्सूर
(२०१४ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट)

पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले.
(मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)

(Image Credit: Wikipedia)

१८७१

गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद
(मृत्यू: २५ मे १९५४)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९७

‘स्वरराज’ छोटा गंधर्व
(जन्म: १० मार्च १९१८)

१९८६

राजनारायण – केंद्रीय आरोग्य मंत्री
(जन्म: ? ? १९१७)

१९७१

डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
(जन्म: १२ ऑगस्ट १९१९)

१९२६

वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य
(जन्म: १२ जुलै १८६३)Pageviews

This page was last modified on 10 September 2021 at 10:52pm