अण्वस्त्रमारा करू शकणार्या ‘अग्नी-२’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर
हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडे सहा कोटी किलोमीटर अंतरावरुन गेला. आता हा धूमकेतू २८ जुलै २०६१ रोजी परत पृथ्वीच्या एवढ्या जवळून जाणार आहे. एखाद्या माणसाच्या आयुष्यात नुसत्या डोळ्यांनी (दुर्बिणीचा वापर न करता) दोनदा दिसू शकणारा हा एकमेव धूमकेतू आहे.
युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन पदच्यूत. युगांडाचा कसाई (Butcher of Uganda) या नावाने तो कुप्रसिद्ध होता.
फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर वरून 'अपोलो-१३' या चांद्रयानाचे प्रक्षेपण झाले. चंद्रावर उतरणारे हे तिसरे यान असणार होते. पण सर्व्हिस मोड्यूलच्या ऑक्सिजन टाकीत बिघाड असल्याचे प्रक्षेपणानंतर दोन दिवसांनी लक्षात आल्यामुळे चंद्रावर न उतरताच त्याला परत यावे लागले.
रोहिणी हत्तंगडी – अभिनेत्री
रामनाथन कृष्णन – पद्मभूषण व अर्जुन पुरस्कार विजेते लॉनटेनिस खेळाडू
डॉ. सुमित्र मंगेश कत्रे – संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक. उच्च शिक्षण क्षेत्रामधील कुशल संघटक, भारतात आधुनिक भाषाशास्त्राची प्रतिष्ठापना करणाऱ्यांत अग्रगण्य
(मृत्यू: ? ? ????)
कुंदनलान सैगल – गायक व अभिनेते
(मृत्यू: १८ जानेवारी १९४७)
जामिनी रॉय – पद्मभूषण पुरस्कार विजेते चित्रकार
(मृत्यू: २४ एप्रिल १९७२)
कस्तुरबा गांधी
(मृत्यू: २२ फेब्रुवारी १९४४)
जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ‘महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विषेशत: समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक
विचारवंत
(मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)
जॉर्ज कॅनिंग – ब्रिटनचे पंतप्रधान
(मृत्यू: ८ ऑगस्ट १८२७)
डॉ. जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ
(मृत्यू: २१ डिसेंबर १८२४)
कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे – कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित
(जन्म: ८ नोव्हेंबर १९१७)
ल्यूथर बरबँक – अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ व कृषीतज्ञ
(जन्म: ७ मार्च १८४९)
This page was last modified on 29 May 2021 at 10:40am