-: दिनविशेष :-

८ एप्रिल


महत्त्वाच्या घटना:

२००५

पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.

१९२९

भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.

१९११

डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा (superconductivity) शोध लावला.

१८३८

‘द ग्रेट वेस्टर्न’ हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३८

कोफी अन्नान – संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) चे ७ वे प्रधान सचिव
(मृत्यू: १८ ऑगस्ट २०१८ - बर्न, स्वित्झर्लंड)

१९२८

रणजित देसाई – नामवंत मराठी साहित्यिक, ‘स्वामी’कार
(मृत्यू: ६ मार्च १९९२)

१९२४

शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ‘कुमार गंधर्व’
(मृत्यू: १२ जानेवारी १९९२)

१९२२

भास्करबुवा बखले

‘गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक, बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू, ‘भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक
(मृत्यू: १७ आक्टोबर १८६९)

(Image Credit: Sruti Magazine)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१३

मार्गारेट थॅचर

मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान
(जन्म: १३ आक्टोबर १९२५)

(Image Credit: Britannica)

१९९९

वसंत खानोलकर – कामगार नेते, समाजवादी चळवळीतील एक अग्रणी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचे वडील
(जन्म: ? ? ????)

१९७४

नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक – मर्दानी रुप, तिन्ही सप्तकांतुन सहजपणे फिरणारा आवाज या देणग्या लाभलेले व गंधर्वयुगाची स्मृती जागवणारे रंगभूमीवरील कलाकार
(जन्म: २४ जून १८९९)

१९७३

पाब्लो पिकासो

पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार
(जन्म: २५ आक्टोबर १८८१)

(Image Credit: Popperfoto/Getty Images)

१९५३

वालचंद हिराचंद दोशी – उद्योगपती
(जन्म: २३ नोव्हेंबर १८८२)

१८९४

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत ‘वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली.
(जन्म: २७ जून १८३८)

१८५७

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामची सुरूवात करणारा मंगल पांडे याला फाशी देण्यात आले. [चैत्र शु. १४]
(जन्म: १९ जुलै १८२७)



Pageviews

This page was last modified on 24 October 2021 at 10:46pm