तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुखमंत्रीपदाची शपथ घेतली. सलग तीनदा मुख्यमंत्री होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत.
(Image Credit: The Indian Express)
दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
जयदीप आमरे या साडेपाच वर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
कमांडर एलन शेफर्ड हा अंतराळयात्रा करणारा पहिला अमेरिकन बनला. रेडस्टोन रॉकेटला जोडलेल्या मर्क्युरी - ३ या कॅप्सूलमधून त्याने हा प्रवास केला. रशियाच्या युरी गागारिनने अंतराळयात्रा करणारा पहिला मानव बनण्याचा विक्रम केल्यानंतर ३ आठवड्यांनी शेफर्ड अंतराळप्रवासी झाला. १५ मिनिटाच्या या प्रवासात तो पृथ्वीपासून १८४ किमी उंच गेला होता.
(Image Credit: bbc.co.uk)
भूमिबोल अदुल्यतेज यांचा थायलंडचे राजे म्हणून राज्याभिषेक झाला.
पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.
ग्यानी झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री
(मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)
कार्ल हाईनरिच मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ, अर्थशास्त्री, इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार, क्रान्तिकारक आणि कम्युनिझमचे प्रणेते
(मृत्यू: १४ मार्च १८८३)
उडा – जपानी सम्राट
(मृत्यू: १९ जुलै ९३१)
नौशाद अली – संगीतकार
(जन्म: २५ डिसेंबर १९१९)
वि. मा. कुलकर्णी – मुलांच्या समस्यांचे अभ्यासक व समाजशास्त्रज्ञ
(जन्म: ? ? ????)
नवल होर्मुसजी टाटा – उद्योगपती, रतन टाटा यांचे वडील, पद्मभूषण [१९६९]
(जन्म: ३० ऑगस्ट १९०४ - मुंबई)
गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझे – ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार होते. वझेबुवांची धृपद, खयाल, ठुमरी आदि गायनप्रकारांवर
हुकमत होती. बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, भालचंद्र पेंढारकर, हरिभाऊ घांग्रेकर हे त्यांचे काही नामांकित विद्यार्थी होत.
(जन्म:
२८ नोव्हेंबर १८७२)
त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ ‘बालकवी’ यांना जळगावजवळील भादली स्टेशनपाशी रेल्वेचे रूळ ओलांडताना आगगाडीखाली सापडून मरण आले.
(जन्म: १३ ऑगस्ट १८९०)
फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट याचे सेंट हेलेना बेटावर निधन
(जन्म: १५ ऑगस्ट १७६९)
This page was last modified on 31 May 2021 at 8:06pm