-: दिनविशेष :-

२ डिसेंबर

जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन

International Day for the Abolition of Slavery

महत्त्वाच्या घटना:

२००१

एन्‍रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

१९९९

काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर

१९८९

भारताचे ७ वे पंतप्रधान म्हणून विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सूत्रे हाती घेतली.

१९८८

बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्‍या त्या पहिल्या महिला होत.

१९७६

फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष बनले(कार्यकाल: २ डिसेंबर १९७६ ते २४ फेब्रुवारी २००८). याआधी ते क्युबाचे १५ वे पंतप्रधान होते (कार्यकाल: १६ फेब्रुवारी १९५९ ते २ डिसेंबर १९७६).

१९७१

अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्‍वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.

१९४२

योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.

१९४२

एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा विधायक उपयोग करण्याचे दालन खुले झाले.

१४०२

जर्मनीतील लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५९

बोम्मन ईराणी

बोम्मन ईराणी – अभिनेता

(Image Credit: Wikipedia)

१९४७

धीरज परसाना – क्रिकेटपटू

१९३७

मनोहर जोशी – लोकसभेचे १३ वे सभापती (कार्यकाल: १० मे २००२ ते २ जून २००४), महाराष्ट्राचे १२ वे मुख्यमंत्री (कार्यकाल: १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९)

१९१३

दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (सतीची पुण्याई, धाकटी मेहुणी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इ. अनेक चित्रपट)
(मृत्यू: ३० डिसेंबर १९८२ - पुणे)

१९०५

अनंत काणेकर

अनंत आत्माराम काणेकर – चतुरस्त्र साहित्यिक, कवी व पत्रकार, ‘पद्मश्री’ व ‘सोविएत लँड नेहरू पुरस्कार’ विजेते. मुंबईतील ‘नाट्यमन्वंतर’ या प्रयोगशील नाट्यसंस्थेचे ते एक संस्थापक होते.
(मृत्यू: ४ मे १९८०)

(Image Credit: मराठी विश्वकोश)

१८९८

इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट
(मृत्यू: २२ जुलै १९१८)

१८५५

सर नारायण गणेश चंदावरकर – कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश (१९०१ -१९१२), मुंबई विधानपरिषदेचे बिनसरकारी अध्यक्ष (१९१९), डिप्रेस्ड क्लास मिशनचे अध्यक्ष (१९०६), इंदूर संस्थानचे मुख्यमंत्री, प्रार्थना समाजाचे प्रमुख (१८९६), सोशल कॉन्फरन्सचे प्रमुख सचिव (१९०१) आणि काँग्रेसचे एक संस्थापक व आजीव सभासद
(मृत्यू: १४ मे १९२३ - बंगळुरू, कर्नाटक)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९६

एम. चेन्‍ना रेड्डी – (अविभाजित) आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ - १९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ - १९८३), राजस्थानचे राज्यपाल (१९९२ - १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ - १९९६)
(जन्म: १३ जानेवारी १९१९ - पेड्डामंगलम, मोईनाबाद, आंध्र प्रदेश)

१९८०

चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान
(जन्म: १५ जुलै १९०५)

१९०६

बाळाजी प्रभाकर मोडक – ‘कालजंत्री‘कार, शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन व तारीख यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे, विज्ञानप्रसारक, लेखक
(जन्म: २१ मार्च १८४७)

१५९४

गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ
(जन्म: ५ मार्च १५१२)

भरा

भरा

भरा

भरा



Pageviews

This page was last modified on 01 December 2021 at 9:25pm