-: दिनविशेष :-

७ जुलै

आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिन


महत्त्वाच्या घटना:

१९७८

सॉलोमन बेटांना (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९४१

दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याचे आइसलँडमधे आगमन झाले.

१९१०

इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे आणि खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.

१८९८

हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले. मात्र, त्यांना अमेरिकेचे राज्य हा दर्जा मिळण्यासाठी पुढे ६० वर्षे वाट पाहावी लागली.

१८९६

मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमधे ऑगस्ते व लुई या ल्युमिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.

१८५४

कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. मुंबई ही कापड उद्योगाची राजधानी असली तरी भारतातील पहिली कापडगिरणी मात्र भडोच येथे तर महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी नागपूरला सुरू झाली होती.

१५४३

फ्रेन्च सैन्याने लक्झेंबर्गचा ताबा घेतला.

क्रीडा:

१९९८

इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.

१९८५

विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८१

महेंद्रसिंग धोणी – क्रिकेटपटू

१९६२

‘स्वरचंद्रिका’ पद्मजा फेणाणी

१९४८

पद्मा चव्हाण

पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री, स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती असलेल्या पद्मा चव्हाणांच्या नाटकांच्या जाहिरातींत त्यांच्या नावाआधी ‘मादक सौंदर्याचा अ‍ॅटम बॉम्ब’ असे छापले जात असे. ‘महाराष्ट्राची मर्लिन मनरो’ व ‘सौंदर्याचा अँटम बॉम्ब’ हे किताब आचार्य अत्रे यांनी त्यांना बहाल केले होते.
(मृत्यू: १२ सप्टेंबर १९९६)

(Image Credit: IMDb)

१९४७

राजे ग्यानेंद्र – नेपाळ नरेश

१९२३

प्रा. लक्ष्मण गणेश जोग – कथाकार, कादंबरीकार, समीक्षक
(मृत्यू: ? ? ????)

१९१४

अनिल बिस्वास – प्रतिभासंपन्न संगीतकार
(मृत्यू: ३१ मे २००३)

१०५३

शिराकावा – जपानी सम्राट
(मृत्यू: २४ जुलै ११२९)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९३०

सर आर्थर कॉनन डॉइल – स्कॉटिश डॉक्टर व ‘शेरलॉक होम्स’ या गुप्तहेरकथांचे लेखक
(जन्म: २२ मे १८५९)

१३०७

एडवर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा
(जन्म: १७ जून १२३९)



Pageviews

This page was last modified on 11 September 2021 at 12:11am