एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.
कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
कोलकाता येथे ‘इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी’चे (INSA) उद्घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.
न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.
मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
बिपाशा बासू – अभिनेत्री व मॉडेल
इरफान खान – भारतीय, ब्रिटिश तसेच अमेरिकन चित्रपटांत भूमिका साकारलेले अभिनेते, पद्मश्री (२०११) पुरस्काराने सन्मानित
(मृत्यू: २९ एप्रिल २०२०)
(Image Credit: विकिपीडिया)
सुप्रिया पाठक – अभिनेत्री
शोभा डे – विदुषी व लेखिका
विजय तेंडुलकर – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक
(मृत्यू: १९ मे २००८ - पुणे, महाराष्ट्र)
‘प्रभात’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या
(मृत्यू: ? ? ????)
चंद्रकांत गोखले – अभिनेते
(मृत्यू: २० जून २००८)
डॉ. सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी
(मृत्यू: १९ एप्रिल २००८)
जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना, १९३२ च्या असहकार आंदोलनातील सक्रिय कार्यकर्त्या, पदमविभूषण (१९५६), अखिल भारतीय गौसेवा संघाच्या अध्यक्षा. स्वातंत्र्यानंतर त्यांनी स्वतःला विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत झोकून दिले. विनोबा भावे यांचा वर्ध्याजवळील सेवाग्राम आश्रम हा बजाज कुटुंबीयांनी दान केलेल्या ३००० एकर जमिनीवर उभा आहे.
(मृत्यू: २१ मे १९७९)
(Image Credit: Jamnalal Bajaj Foundation)
डॉ. अच्युतराव आपटे – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले, विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक
(जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)
मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट
(जन्म: २९ एप्रिल १९०१)
This page was last modified on 21 May 2021 at 11:44am