-: दिनविशेष :-

२१ मार्च

जागतिक अरण्य दिन

आंतरराष्ट्रीय कविता दिन


महत्त्वाच्या घटना:

२०००

फ्रेंच गयानातील कोअरु येथून ‘एरियन ५०५’ या वाहकाद्वारे भारताचा ‘इन्सॅट ३-बी’ हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.

१९९०

नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९८०

अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.

१९७७

भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.

१९३५

शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.

१८७१

ऑटो व्हॉन बिस्मार्क हा जर्मनीचा चॅन्सेलर बनला.

१८५८

इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ याने झाशीस वेढा दिला.
[चैत्र शु. ७]

१६८०

छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलाबा (रायगड) किल्ल्याची बांधणी सुरू केली.

१५५६

ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्‍या आर्चबिशप थॉमस क्रॅनमरला शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७८

राणी मुखर्जी – अभिनेत्री

१९१६

बिस्मिला खाँ – शहनाई नवाझ
(मृत्यू: २१ ऑगस्ट २००६)

१८८७

मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक
(मृत्यू: २६ जानेवारी १९५४)

१८४७

बाळाजी प्रभाकर मोडक – ‘कालजंत्री‘कार, शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन व तारीख यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे, विज्ञानप्रसारक, लेखक
(मृत्यू: २ डिसेंबर १९०६)

१७६८

जोसेफ फोरियर – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: १६ मे १८३०)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१७

गोविंद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक
(जन्म: २२ जुलै १९२५)

२०१०

पांडुरंग लक्ष्मण तथा ‘बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक
(जन्म: २९ मार्च १९२६)

२००५

दिनकर द. पाटील – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक
(जन्म: ६ नोव्हेंबर १९१५)

१९८५

सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता
(जन्म: २० मार्च १९०८)

१९७३

यशवंत रामकृष्ण दाते – कोशकार. चिं. ग. कर्वे यांच्या साहाय्‍याने त्यांनी ‘महाराष्ट्र मंडळ कोश’ स्थापन करून आठ खंडांचा ‘महाराष्ट्र शब्दकोश’ तयार केला.
(जन्म: १७ एप्रिल १८९१)

१९७३

‘आतुन कीर्तन वरुन तमाशा’ या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
(जन्म: ? ? ????)Pageviews

This page was last modified on 22 August 2021 at 8:58pm