नॉर्थवेस्ट एअरलाईन्सचे डेल्टा एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन डेल्टा एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार
चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान
माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकरत्न पुरस्कार’ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर
अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा ‘एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ जाहीर
स्वदेशात बनविलेली ‘कामिनी’ ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्कम येथे कार्यान्वित करण्यात आली. युरेनिअम-२३३ हे इंधन वापरणारी ही आशियातील पहिली अणूभट्टी आहे.
मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘होमी भाभा पुरस्कार‘ डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर
टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
महर्षि धोंडो केशव कर्वे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान
बेनिटो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना
प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक. त्यांनी पटकथा लिहिलेले ‘एक धागा सुखाचा’, ‘मधुचंद्र’, ‘रात्र वादळी काळोखाची’ यांसारखे मराठी चित्रपट गाजले. तसंच त्यांच्या कथेवर राज कपूरने काढलेला ‘बीवी ओ बीवी’ हा विनोदी सिनेमाही बऱ्यापैकी गाजला होता.
(मृत्यू: ७ मार्च २०००)
(Image Credit: Bytes of India)
जोसेफ गोबेल्स – जर्मनीचा चॅन्सेलर व नाझी नेता. ३० एप्रिल १९४५ रोजी हिटलरने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे जोसेफ गोबेल्स हा जर्मनीचा चॅन्सेलर (पंतप्रधान) झाला. मात्र दुसऱ्याच दिवशी आपल्या सहा मुलांना सायनाईड देऊन गोबेल्स व त्याच्या पत्नीने आत्महत्या केली.
(मृत्यू: १ मे १९४५)
(Image Credit: Wikipedia)
वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे
(जन्म: १३ एप्रिल १८९५)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
This page was last modified on 27 October 2021 at 11:24pm