-: दिनविशेष :-

२१ नोव्हेंबर

भाषिक सुसंवाद दिन
महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन
सेना दिवस (बांगला देश)
सेना दिवस (ग्रीस)
World Television Day
‘English’ ही जगात सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. ती इंडो-युरोपिअन कुटुंबाच्या जर्मेनिक गटातील भाषा आहे. तिचे ‘इंग्रजी’ हे मराठीतील नाव पोर्तुगीज भाषेतून घेतले आहे. मुळात इंग्लंडची असणारी ही भाषा इंग्लंडच्या ताब्यात असणार्‍या जगातील अनेक भागांत पसरली आहे. आजही भारतातील अरुणाचल प्रदेश व नागालँड या राज्यांची ती राजभाषा आहे!

महत्त्वाच्या घटना:

१९७२

दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.

१९७१

बांगलादेश मुक्ती संग्राम – भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.

१९६२

भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.

१९४७

पहिले टपाल तिकीट

स्वतंत्र भारताचे पहिले टपाल तिकीट जारी करण्यात आले. साडे तीन आणे किमतीच्या या तिकिटावर भारताचा नवीन ध्वज दर्शवण्यात आला होता. मात्र हे तिकीट फक्त परदेशी टपाल पाठवण्यासाठी वापरायचे होते.

(Image Credit: Wikipedia)

१९४२

दहा वाजता

राजा नेने दिग्दर्शित ‘दहा वाजता’ हा ‘प्रभात’चा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

(Image Credit: Cinestaan)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८७

ईशा करवडे
२०१२ मधील छायाचित्र

ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू, इंटरनॅशनल मास्टर (२०१०), वुमन ग्रँड मास्टर (२००५), सर्वोत्तम फिडे रेटिंग २४१४ (२०१४). २०१०, २०१२ आणि २०१४ च्या चेस ऑलीम्पियाडस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

(Image Credit: विकिपीडिया)

१९२७

शं. ना. नवरे

शंकर नारायण तथा शं. ना. नवरे – लेखक, नाटककार व पटकथाकार. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात. ‘शन्नाडे’ या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. तिळा उघड, जत्रा, कोवळी वर्षं, इंद्रायणी, सखी, खलिफा, भांडण, बेला, झोपाळा, वारा, निवडुंग, परिमिता, मनातले कंस, शहाणी सकाळ, बिलोरी, मार्जिनाच्या फुल्या, अनावर, एकमेक, मेणाचे पुतळे, सर्वोत्कृष्ट शन्ना, तिन्हीसांजा, शांताकुकडी, कस्तुरी, पर्वणी, झब्बू, पाऊस, निवडक, पैठणी, असे त्यांचे एकूण २७ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. एक असतो राजा, मन पाखरू पाखरू, धुक्यात हरवली वाट, नवरा म्हणू नये आपला, ग्रँड रिडक्शन सेल, सुरुंग, धुम्मस, सूर राहू दे, हवा अंधारा कवडसा, गहिरे रंग, गुलाम, वर्षाव, रंगसावल्या, हसत हसत फसवुनी, मला भेट हवी हो ही त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या ‘महानंदा’ या कादंबरीवरून लिहिलेले ‘गुंतता हृदय हे’ हे नाटक अतिशय गाजले आहे.
(मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३)

(Image Credit: लोकसत्ता)

१९२६

प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते
(मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)

१६९४

व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक
(मृत्यू: ३० मे १७७८)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९६

डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम
(जन्म: २९ जानेवारी १९२६ - संतोकदास, साहिवाल, पंजाब, पाकिस्तान)

१९७०

सर चंद्रशेखर वेंकट रमण – नोबेल पारितोषिक (१९३०) विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)

१९६३

चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक
(जन्म: १९ जानेवारी १८९२)



Pageviews

This page was last modified on 25 September 2021 at 11:39pm