हा या वर्षातील ६३ वा (लीप वर्षातील ६४ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण
१९९६ : चित्रकार रवी परांजपे यांना ’कॅग हॉल ऑफ फेम’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर
१९८० : प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.
१९६१ : १९४६ मधे इंग्लंडमधे बनवलेली युद्धनौका भारतीय सैन्यदलात दाखल झाली व तिचे ’आय. एन. एस. विक्रांत’ असे नामकरण करण्यात आले. ही भारतीय आरमारात दाखल झालेली पहिली विमानवाहू नौका होती.
१९५१ : नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्‍घाटन झाले. या खेळांत ११ देशांतील ४८९ महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग होता.
१९३८ : सौदी अरेबियात प्रथमच खनिज तेल सापडले.
१८६१ : अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले.
१७९१ : व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२२ : दीना पाठक – अभिनेत्री (मृत्यू: ११ आक्टोबर २००२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११ : अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (जन्म: ५ नोव्हेंबर १९३०)
२००० : गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य (जन्म: ८ जानेवारी १९२४)
१९९९ : विठ्ठल गोविंद गाडगीळ – भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, ’एअर इंडिया’चे पहिले कर्मचारी (जन्म: ? ? ????)
१९९६ : आत्माराम सावंत – नाटककार व पत्रकार (जन्म: ? ? ????)
१९९५ : इफ्तिखार – चरित्र अभिनेता (जन्म: २२ फेब्रुवारी १९२०)
१९९२ : शांताबाई परुळेकर – ’सकाळ’च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका (जन्म: ? ? ????)
१९७६ : वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २३ जुलै १८८६)
१९५२ : सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२) ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७ - आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड)
१९४८ : डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक आणि नाशिक येथील ’भोंसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक (जन्म: १२ डिसेंबर १८७२)
१९२५ : ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक, नाटककार, संगीतकार, चित्रकार व संपादक, रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगालीत भाषांतर केले (जन्म: ४ मे १८४९ - कोलकाता, पश्चिम बंगाल)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 27 February, 2014 14:21