हा या वर्षातील १८ वा दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००५ : एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.
१९९९ : नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.
१९९८ : मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९७ : नोर्वेच्या बोर्ग आऊसलंडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.
१९७४ : इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.
१९५६ : संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार
१९११ : युजीन बी. इलायने सानफ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
१७७८ : कॅप्टन जेम्स कूक हा हवाई बेटांवर पोचणारा पहिला युरोपियन बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७२ : विनोद कांबळी – भारतीय क्रिकेटपटू
१९६६ : अलेक्झांडर खलिफमान – रशियन बुद्धिबळपटू
१९५२ : वीरप्पन – चंदन तस्कर (मृत्यू: १८ आक्टोबर २००४)
१९३३ : जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)
१८८९ : शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार (मृत्यू: १ आक्टोबर १९३१)
१८८९ : देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. – कन्नड कवी व विचारवंत (मृत्यू: ७ आक्टोबर १९७५ - बंगळुरू, कर्नाटक)
१८४२ : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)
१७९३ : महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होत. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले. (मृत्यू: ४ आक्टोबर १८४७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१५ : शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ – लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत ​अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री. प्रभात फिल्म कंपनीचा 'दहा वाजता' (१९४२) हा त्यांचा पहिला सिनेमा. पुढे 'प्रभात'च्या 'रामशास्त्री प्रभुणे' सिनेमातील त्यांची भूमिका गाजली. बालकलाकार म्हणून अभिनयात ठसा उमटविलेल्या शकुंतला यांनी पुढील काळात हिंदी आणि मराठीतील दिग्गज कलावंतांसोबत काम केले. भूमिका गाजवल्या. परदेस, कमल के फूल, शिकायत, भाग्यवान, बिंदिया, बचपन, बच्चों का खेल, मोती, पूजा, नन्हे मुन्हे, सपना अशा अनेक हिंदी सिनेमांतून त्यांची कारकीर्द बहरली. १९५० मध्ये 'परदेस' हा सिनेमा लागला. मधुबाला आणि बेबी शकुंतला यांच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही हा सिनेमा गाजला. हिंदीतील प्रख्यात दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या 'बिराज बहू' सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. गायक-कलाकार किशोरकुमार यांच्यासोबत फरेब, लहेरे या सिनेमातील भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. छत्रपती शिवाजी, सीता स्वयंवर, मोठी माणसं, श्रीकृष्ण दर्शन, मी दारू सोडली, अखेर जमलं, चिमणी पाखरे, मूठभर चणे, मालती माधव, संत बहिणाबाई, तोतयाचे बंड, तारामती या मराठी सिनेमातील भूमिका प्रामुख्याने गाजल्या. सिनेकारकीर्द बहरात असताना १९५४ मध्ये त्यांचा गडहिंग्लज येथील इनामदार घराण्यातील श्रीमंत बाबासाहेब नाडगौंडे यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी सिनेमात काम करायचे बंद करून संसाराला वाहून घेतले. राज्य सरकाने त्यांना १९९६ मध्ये विशेष सन्मान केला होता. कोल्हापूर भूषण, करवीरभूषण, कलाभूषण, जीवनगौरव हे पुरस्कार त्यांच्याकडे चालत आले. प्रभात फिल्म कंपनीत बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर चमकलेल्या शकुंतला यांनी सहजसुंदर अभिनयाने स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला. कारकीर्द बहरात असताना त्यांनी १९५४ मध्ये सिनेसृष्टीचा निरोप घेतला. मात्र, त्यांची प्रेक्षक आणि सिनेमाशी नाळ शेवटपर्यंत कायम राहिली. या अभिनेत्रीची मोहिनी शेवटपर्यंत प्रेक्षकांवर राहिली. वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. आणि त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला. बेबी शकुंतला यांनी मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवला. (जन्म: १७ नोव्हेंबर १९३२ - पुणे)
२००३ : हरिवंशराय बच्‍चन – हिन्दी कवी (जन्म: २७ नोव्हेंबर १९०७)
१९९६ : एन. टी. रामाराव – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री (जन्म: २८ मे १९२३)
१८९३ : आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत, ’मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक (जन्म: १२ मे १९०५)
१९४७ : कुंदनलान सैगल – गायक व अभिनेते (जन्म: ११ एप्रिल १९०४)
१९३६ : रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (जन्म: ३० डिसेंबर १८६५)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 22 January, 2015 0:14