हा या वर्षातील १७६ वा (लीप वर्षातील १७७ वा) दिवस आहे.

       कोल्हापूर संस्थानात अ‍ॅल्युमिनिअम बनवण्यासाठी लागणार्‍या बॉक्साईटचे मोठ्या प्रमाणावर साठे असल्याचे आढळून आल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी अ‍ॅल्युमिनिअमचा कारखाना काढण्याचे प्रयत्‍न सुरू केले. शाहूमहाराजांचे निधन झाल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी ब्रिटिशांच्या सहकार्याने असा कारखाना काढण्यासाठी लंडनमधे कंपनीही स्थापन केली होती.

महत्त्वाच्या घटना:

२००० : मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्‍चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले. हा सन्मान मिळवणारा तो पहिला हिन्दी अभिनेता ठरला.
१९८३ : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारत विजेता.
१९७५ : पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी जाहीर केली.
१९७५ : मोझांबिकला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१९३४ : महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.
१९१८ : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८६ : सई ताम्हनकर – अभिनेत्री
१९७५ : व्लादिमिर क्रामनिक – रशियन बुद्धीबळपटू
१९७४ : करिश्मा कपूर – अभिनेत्री
१९३१ : विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००८)
१९२४ : मदनमोहन – संगीतकार (मृत्यू: १४ जुलै १९७५)
१९०३ : एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार (मृत्यू: २१ जानेवारी १९५०)
१९०० : लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००९ : मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)
२००० : रवीबाला सोमण-चितळे – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या (जन्म: ????)
१९७९ : अण्णासाहेब – मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष (जन्म: ????)
१९२२ : सत्येंद्रनाथ दत्त – बंगाली कवी (जन्म: ? ? १८८२)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 17 February, 2014 22:44