हा या वर्षातील १८७ वा (लीप वर्षातील १८८ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००६ : चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी ’नाथू ला’ ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
१९८२ : पुणे - मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
१९४७ : रशियात ए के ४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरूवात झाली.
१९१० : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची (Bhandarkar Oriental Research Institute) पुणे येथे स्थापना
१८९२ : ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून दादाभाई नौरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तिची निवड झाली.
१८८५ : लुई पाश्चर याने रेबीज या रोगावरील लशीची यशस्वी चाचणी केली.
१७८५ : ’डॉलर’ हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारित होते.
१७३५ : मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५२ : रेखा शिवकुमार बैजल – साहित्यिका
१९४६ : जॉर्ज डब्ल्यू. बुश – अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष
१९३० : डॉ. एम. बालमुरलीकृष्णन – दाक्षिणात्य संगीताचे गायक व व्हायोलिनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)
१९२७ : व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार, शिकारी (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)
१९२० : डॉ. विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, ’इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले (३० जुलै १९९५)
१९०५ : लक्ष्मीबाई केळकर – राष्ट्रसेविका समितीच्या अंस्थापिका (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)
१९०१ : डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (मृत्यू: २३ जून १९५३)
१८८१ : संत गुलाबराव महाराज (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)
१८६२ : एल. के. अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)
१८३७ : सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)
१७८१ : सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (मृत्यू: ५ जुलै १८२६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२ : धीरुभाई अंबानी – उद्योगपती (जन्म: २८ डिसेंबर १९३२)
१९९९ : एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज (जन्म: ३ मार्च १९३९)
१९९७ : चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ३ जानेवारी १९२१)
१९८६ : ’बाबू’ जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (जन्म: ५ एप्रिल १९०८)
१८५४ : जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १६ मार्च १७८९)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 8 January, 2014 0:10