हा या वर्षातील १४६ वा (लीप वर्षातील १४७ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९९ : श्रीहरिकोटा येथून ’पी. एस. एल. व्ही. - सी. २’ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा ’आय. एस. एस. पी. ४’ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. - टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले. या उड्डाणाद्वारे भारताने प्रथमच उपग्रह प्रक्षेपणाची सेवा देणार्‍या जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला.
१९८९ : मुंबईजवळच्या ’न्हावा-शेवा’ बंदराचे उद्‍घाटन झाले.
१९८६ : युरोपियन समुदायाने (EU) नवीन ध्वज अंगीकारला.
१९७१ : बांगलादेशातील सिल्हेट येथे पाकिस्तानी सैन्याने ७१ हिंदूंची कत्तल केली.
१८९६ : निकोलस (दुसरा) रशियाचा झार बनला.

क्रिकेट:

१९९९ : सौरभ गांगुलीने श्रीलंकेविरुद्ध १८३ धावा करुन विश्वकरंडक स्पर्धेत नवीन विक्रम नोंदविला. कपिलदेवने १८९३ मधे झिम्बाब्वे विरुद्ध केलेल्या १७५ धावांचा विक्रम गांगुलीने मोडला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६६ : झोला बड – दक्षिण अफ्रिकेची धावपटू
१९४५ : विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (मृत्यू: १४ ऑगस्ट २०१२)
१९०६ : बेन्जामिन पिअरी पाल – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक, पद्मश्री (१९५८), पद्मभूषण (१९६८), इंडीयन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च (ICAR) चे पहिले संचालक, तांबेरा रोगाला दाद न देणार्‍या व अधिक उत्पादन देणार्‍या गव्हाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९८९)
१९०२ : सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ 'कुमुदबांधव' – नाटककार व साहित्यिक (मृत्यू: २७ जानेवारी १९६८)
१८८५ : राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक. ते ’गोविन्दाग्रज’ या टोपणनावाने कथालेखन करीत तर ’बाळकराम’ या नावाने विनोदी लेखन करीत. ‘प्रेमसंन्यास‘, ‘पुण्यप्रभाव‘, ‘एकच प्याला‘, ‘भावबंधन‘, ‘राजसंन्यास‘ ही त्यांची नाटके अतिशय गाजली. ’वाङ्वैजयंती’ नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत. (मृत्यू: २३ जानेवारी १९१९)
१६६७ : अब्राहम डी. मुआव्हर – फ्रेन्च गणिती (मृत्यू: २७ नोव्हेंबर १७५४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००० : श्रीपाद वामन काळे – अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक (जन्म: ? ? ????)
२००० : प्रभाकर शिरुर – चित्रकार (जन्म: ? ? ????)
१९०८ : मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक (जन्म: १३ फेब्रुवारी १८३५)
१९०२ : अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक [टेलिफोन एक्सचेंज] (जन्म: ११ फेब्रुवारी १८३९)
१७०३ : सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक (जन्म: २३ फेब्रुवारी १६३३)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Tuesday, 4 March, 2014 13:23