हा या वर्षातील ३२४ वा (लीप वर्षातील ३२५ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००८ : अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे ’डाऊ जोन्स’ निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
१९९९ : अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ’हॅरी होल्ट पुरस्कार’ लता जोशी यांना जाहीर.
१९९९ : आर. जी. जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा ’राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर
१९९८ : ’इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’चे (ISS) प्रक्षेपण झाले.
१९९७ : अमेरिकेच्या ‘कोलंबिया‘ या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.
१९९४ : भारताची ऐश्वर्या राय ’मिस वर्ल्ड’ किताबाची मानकरी बनली.
१९४५ : न्युरेम्बर्ग ट्रायल्स – दुसर्‍या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी २४ जणांवर खटला सुरू झाला.
१९१७ : युक्रेन प्रजासत्ताक बनले.
१७८९ : न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३९ : वसंत पोतदार – मराठी साहित्यिक (३० एप्रिल २००३ - नाशिक)
१९२७ : चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी – मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, वकील, लेखक, स्वातंत्र्यसैनिक, पद्मभूषण
१९०५ : मिनोचर रुस्तुम तथा ’मिनू’ मसानी – संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित व स्वतंत्रता पक्षाचे नेते (मृत्यू: २७ मे १९९८)
१८८९ : एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५३)
१७५० : शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान – हैदरअलीचा थोरला मुलगा व मैसूरचा वाघ (मृत्यू: ४ मे १७९९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९ : दत्ता महाडिक पुणेकर – तमाशा कलावंत (सोंगाड्या) (जन्म: ? ? ????)
१९९८ : दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरूजी – संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक (जन्म: ? ? ????)
१९९७ : शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर – स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक (कोणतेही नाते नव्हते), हिन्दू महासभेचे अध्यक्ष (जन्म: ? ? ????)
१९८९ : ’गानहिरा’ हिराबाई बडोदेकर – भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू. ’पुण्यप्रभाव’, ’सौभद्र’, ’विद्याहरण’, ’युगांतर’ आदी नाटकांत त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. नाटकांतील पदांच्या त्यांच्या ध्वनिमुद्रिका खूप गाजल्या. १९७० मधे त्यांना ’विष्णूदास भावे सुवर्णपदक’ देण्यात आले. (जन्म: १९ मे १९०५ - बडोदा)
१९८४ : फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (जन्म: १३ फेब्रुवारी १९११)
१९७३ : केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते (जन्म: १७ सप्टेंबर १८८५)
१९७० : यशवंत खुशाल देशपांडे – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक, १९३९ मधे झुरिच येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेतील भारताचे प्रतिनिधी (जन्म: १४ जुलै १८८४)
१९१० : लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक (जन्म: ९ सप्टेंबर १८२८)
१८५९ : माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया’ या दोन खंडात भारताचा इतिहास लिहिला. (जन्म: ६ आक्टोबर १७७९)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 27 February, 2014 21:42